राज्यात टोलचा 'झोल'!

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 22:48

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोल विरोधात रणशिंग फुंकलं आणि राज्यभरात त्याचे पडसाद उमटले...पण नेमकं काय आहे टोलचं गौडबंगाल ? खर्च वसूल होऊनही का केली जातेय टोल वसुली ? जनतेच्या मानगुटीवरुन कधी उतरणार टोलचं भूत ? कुणाचं उखळ पांढरं करण्यासाठी चालवले जातायत टोल ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात घोळत आहेत.. टोलच्या उद्देशापासून ते त्याच्या अर्थकारणापर्यंतचा वेध घेतला आहे. टोलचा 'झोल'! मधून.

दहावी पास पुढे काय?

Last Updated: Thursday, June 14, 2012, 07:44

आज दहावीचा निकाल लागला.. राज्याचा निकाल ८१.३२ टक्के इतका लागला आहे. १० वीचं वर्ष प्रत्येकाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. मात्र खरी कसोटी सुरू होते ती १०वी नंतर. १० नंतर कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचं असा यक्ष प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर पडलेला असतो.

राष्ट्रवादी-शिवसेनेतला 'घर'चा प्रश्न

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 14:21

झोपडपट्टी पुनर्वसनसारख्या योजनांमध्ये बर-याचदा घरंच बांधून नसतात तर ब-याच बांधलेल्या घरांची अवस्था अशी असते की त्यात राहिला न गेलेलं बर अशी भावना होते. पण जर ही घर व्यव्यस्थित बांधून असूनही जर लाभार्थीना मिळत नसली तर काय म्हणायचं.

Exclusive- मार्कशीट दहावीचे

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 14:24

दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीचे वर्ग जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक आज शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केले.

गर्भपातासाठी बनावट प्रिस्क्रिप्शन!

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 21:45

राज्यात स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न ऐरणीवर असताना अवैध गर्भपातासाठी पेशंटकडून डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शन चा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनानं गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष मोहीम उघडलीय.

डॉ. आंबेडकरांचे कधी होणार स्मारक ?

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 22:34

आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आणि उपनगरांमध्ये आंदोलन सुरु केलंय...डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा त्वरीत देण्यात यावी अशी आरपीआयची मागणी आहे....पण हे स्मारक कधी उभं राहणार असा प्रश्न आता आंबेडकरी जनतेकडून विचारला जात आहे.

‘झी 24तास’चा दणका; ‘कुष्ठधाम’चा कायापालट

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 11:32

सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील केडगावच्या ‘कुष्ठधाम’ या सरकारी भिक्षेकरी गृहातील छळछावणीचा ‘झी 24 तास’नं पर्दाफाश केला होता. यानंतर एका दिवसात कुष्ठधामचा कायापालट करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. जिल्हा प्रशासनानं या बातमीची गंभीर दखल घेतलीय.

कुष्ठधाम की मृत्यूधाम ?

Last Updated: Monday, June 11, 2012, 22:40

भिक्षेका-यांची भिक मागण्याची वृत्ती नाहीसी व्हावी म्हणून भिक्षेकरी गृह उभारण्यात आलेत...पण सोलापूर जिल्ह्यातील केडगावचं कुष्ठधाम जणू नरक बनलंय़...पुढचा आर्धातास आम्ही त्या कुष्ठधाममधील अनेक धक्कादाय घटनांचा तपशीलवर खुलासा प्राईम वॉचमध्ये ...कुष्ठधाम की मृत्यूधाम ?

नालेसफाईसाठी बालमजूर वेठीला

Last Updated: Monday, June 11, 2012, 15:42

पावसाळा तोंडावर आला असल्याने कल्याण डोंबिवलीतील शहरातील नालेसफाईची आणि गटार सफाईची कामे सुरु असून या कामासाठी ठेकेदाराने चक्क बाल कामगार वापरल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. झी 24 तासनंही कल्याणच्या सहाय्यक कामगार आयुक्तांना याबाबत विचारणा केली असता अतिशय बेजबाबदार उत्तर मिळाली.

पेपरफुटी प्रकरणी प्राचार्याला अटक

Last Updated: Monday, June 11, 2012, 08:36

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इंडिनिअरींग शाखेच्या पेपरफुटीप्रकरणी हिंगोली जिल्हयातून एका प्राचार्याला आणि प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे.