सुधारगृहात भिकारी निराधार

Last Updated: Sunday, June 10, 2012, 09:21

भिका-यांना स्वकष्टानं जगता यावं यासाठी केडगावच्या या सुधारगृहाची स्थापना करण्यात आली. पण इथे तर त्यांना जिवंतपणीच मारण्याचं काम सुरू आहे. अंगात घालायला ना धड कपडे ना पोटाला अन्न. शेतीचं काम देणं सोडाच दिवसभर त्यांना खोलीत डांबून ठेवलं जातं.

दीडशे वर्षांनंतर 'भाऊ' धक्क्यालाच

Last Updated: Saturday, June 9, 2012, 18:03

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. मात्र, येथील समस्या आजही दीडशे वर्षानंतर कायम आहे. त्यामुळे भाऊच्या धक्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दीडशे वर्षांनंतर जुन्याच बोटींने प्रवास करावा लागत असल्याने हा प्रवास जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

युरो कप २०१२- पॉईंट टेबल

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 08:50

युरो कप २०१२- पॉईंट टेबल.. पॉईंट टेबल पाहा.. युरो कपमध्ये कोण मारणार नक्की बाजी... युरो कप पॉईंट टेबल विशेष पेज...

मोबाईल फोबिया

Last Updated: Friday, June 8, 2012, 22:40

ब्रिटनमध्ये नुकतंच एक संशोधन करण्यात आलंय. त्या संशोधनातून जे काही निष्कर्ष निघाले आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत. मोबाईल फोन वापरणाऱ्या लोकांना सतत एक अनाहूत भीती सतावत असते आणि ती भीती कोकेनच्या नशेपेक्षाही भयंकर आहे. ती आहे, मोबाईल फोन हरवण्याची भीती!

Exclusive– युरोचा कपचा थरार

Last Updated: Saturday, June 30, 2012, 16:40

फूटबॉल वर्ल्ड कपनंतर महत्त्वाची अशी युरो कप टूर्नामेंट पोलंड आणि युक्रेनमध्ये होणार आहे. या थरार महामेळाची बित्तम बातमी आम्ही देणार आहोत.

बुलेट ट्रेन

Last Updated: Thursday, June 7, 2012, 22:49

परदेशाप्रमाणेच आता भारतातही ताशी साडेतीनशे किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ट्रेनचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ही भारतातली पहिली बुलेट ट्रेन ठरणार आहे. केंद्राकडूनही या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालाय.

मान्सून ऑडिट

Last Updated: Thursday, June 7, 2012, 08:39

अखेर मान्सून राज्यात दाखल झालाय आणि लवकरच तो मुंबईतही धडक देणार आहे. पण मान्सूनचा सामना करण्यासाठी मुंबई पालिकेनं काय तयारी केलीय? जे दावे पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येतायत, त्यात तथ्य आहे का? मुंबईत २६ जुलैसारखा पाऊस झाला तर? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊयात ‘मान्सून ऑडिट’मधून...

शाळेचा 'डोलारा' कोण सांभाळणार?

Last Updated: Thursday, June 7, 2012, 09:12

ठाणे जिल्ह्यातील डोलारा गावाच्या पाणीटंचाईचं भीषण वास्तव झी २४ तासनं उघड केलं. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनानं डोलारावासियांना पाणी देण्याचा निर्णय घेतला. मात्र समस्या जणू डोलारावासियांच्या पाचवीला पुजल्यात.

सूर्याच्या कुंडलीत शुक्र!

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 00:01

पृथ्वीपासून १५ कोटी किलोमीटर दूर अंतरावर, १५ कोटी डिग्री सेल्सियस तापमान... सूर्यापर्यंत पोहचण्यापूर्वीच कोणतीही वस्तू जळून राख होईल... पण, इतकं भयंकर तापमान असलं तरी या ब्रम्हांडात आणखी कोणी तरी आहे जो पृथ्वीच्या तुलनेत सूर्याच्या कितीतरी पट जवळ आहे. शतकातून एकदाच तो पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध उभा ठाकतो आणि थेट सूर्याशी सामना करतो...

मुंबई धोक्यात!

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 08:11

समुद्राच्या वाढत्या जलस्तरामुळे, भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील काही भाग येत्या ९० वर्षांत बुडण्याची शक्यता आहे. देशातल्या २२० वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानंतर त्यांनी हा निष्कर्ष मांडलाय. महानगरी मुंबईला हा धोका सर्वाधिक असल्याचंही सांगण्यात येतंय.