विधान परिषद निवडणूक : कोणाला किती मते?

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 07:53

विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. अमरावती-चंद्रपूर भाजपकडे, तर कोकण- परभणीत राष्ट्रवादीने बाजी मारली. भाजप व राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या तर काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. विधान परिषदेसाठी २५ मे रोजी निवडणूक झाली होती.

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी महागणार

Last Updated: Saturday, May 26, 2012, 13:06

सरकारी जनरल इंश्युरन्स कंपन्या हेल्थ इंश्यूरन्स पॉलिसी महाग करण्याची शक्यता आहे. सतत वाढणारा इलाजाचा खर्च आणि क्लेमच्या संख्यांमध्ये होणा-या सततच्या वाढीमुळे सरकारनं प्रीमियमच्या रक्कमेत वाढ करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलंय.

मोदी पर्व ?

Last Updated: Friday, May 25, 2012, 22:50

नरेंद्र मोदी आज ज्या उंचीवर उभे आहेत, त्या स्थानावर आता मागे वळून पाहणं अशक्य आहे. गेल्या दहा वर्षात विकास पुरुष म्हणून मोंदीनी ओळख निर्माण केलीय. तसेच भाजपमध्येही त्यांच्या तोलामोलाचा दुसरा नेता सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे मोदींना घेरण्याचा प्रयत्न आप्तस्वकीयांकडूनच केला जाणार हेही उघडचं आहे.

भाजपनं काय कमावलं, काय गमावलं?

Last Updated: Friday, May 25, 2012, 19:34

मिशन 2014 हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक मोठ्या गाजावाजात मुंबईत पार पडली खरी मात्र, या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्तानं भाजपातील दुफळीच प्रामुख्यानं समोर आली.

मार्कशीट बारावीचे

Last Updated: Friday, May 25, 2012, 17:29

राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली . बारावीचा निकाल ६७.९४ टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल. हा निकाल मोबाइलवरही पाहाण्याची सोय आहे.

मंत्र्यांची इंधनावर उधळपट्टी

Last Updated: Friday, May 25, 2012, 12:28

केंद्रीय कॅबिनेट मंत्री तसंच राज्य मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षात पेट्रोल आणि डिझेलवर तब्बल 3 कोटी 67 लाख रूपये उधळले आहेत.पेट्रोल दरवाढीचा भडका उडालाय. मात्र दुस-या बाजुला जनतेचे सेवक म्हणवणारे लोकप्रतिनिधी मात्र पेट्रोल, डिझेलवर करोडो रूपये उधळत आहेत.

१२ वीचा निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा

Last Updated: Friday, May 25, 2012, 14:20

विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल. हा निकाल मोबाइलवरही पाहाण्याची सोय आहे.या वर्षी बारावीला एकूण १३,४६,३०५ विद्यार्थी बसले असून मुंबईमध्ये ७,७८,२७८ विद्यार्थी आहेत.

कोणाची अग्निपरीक्षा?

Last Updated: Thursday, May 24, 2012, 23:35

मुंबईत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीला सुरुवात झालीय. दोन दिवस चालणा-या या बैठकीत पुढच्या दोन वर्षासाठीची रणनीती प्रामुख्यानं ठरवली जाणार आहे.

एस.आर.एचा प्रताप, घरांसाठी मृतांची संमती

Last Updated: Thursday, May 24, 2012, 14:07

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा म्हणजेच एस.आर.ए.चा आणखी एक प्रताप पुण्यात पुढे आलाय. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मृत व्यक्तीना पात्र ठरवण्यात आलंय. त्यासाठी या मृत व्यक्तींची संमती मिळवण्याचा चमत्कारही एसआरएनं करून दाखवलाय.

पेट्रोल वाढता वाढता वाढे.....

Last Updated: Friday, May 25, 2012, 16:46

सामान्यांना पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे, मात्र आजवर कधीही झाली नव्हती इतक्या मोठ्याप्रमाणात पेट्रोल मध्ये झालेली ही दरवाढ आहे, पेट्रोल दरवाढ ही तब्बल ७,५० रूपयांनी वाढ झाली आहे.