Last Updated: Wednesday, May 30, 2012, 08:43
-----------------------------

कोलकात्यात रंगाचा झाला बेरंग…कोलकाता नाइटरायडर संघाच्या आपीएल विजेतेपदानंतर कोलकत्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर आज जंगी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण, कौतुक सोहळ्यासाठी जमलेल्या लोकांनी आपल्या सेलिब्रिटीजला पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी मैदानातच एकच धिंगाणा केला त्यामुळे कौतुक सोहळ्याला हिंसेचा रंग मिळाला.
---------------------------

आयपीएल – क्रिकेटचा ‘विद्रूप’ अवतारक्रिकेटला फायदा होण्यासाठी क्रिकेटचं एन्टरटेन्मेंट पॅकेज तयार करण्यात आलं. मात्र, पैशाचा हव्यास, ग्लॅमर आणि एन्टरटेन्मेंटच्या नावाखाली क्रिकेटमध्ये वेगळाच तमाशा सुरु झाला.
--------------------------
----------------------------

आयपीएल संगे, रेव्ह पार्टी रंगे!मुंबईतल्या रेव्ह पार्टीत आणखी एक नवा खुलासा समोर आलाय. या रेव्ह पार्टीत आयपीएलचे दोन नव्हे तर सहा खेळाडू होते. मात्र पोलिसांच्या रेडपूर्वीच इतर चार खेळाडू पसार झाल्याचं समोर आलंय.
--------------------------

रेव्ह पार्टीत मनिषा कोईरालाही सहभागीमुंबईतल्या रेव्ह पार्टीत बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाही आढळल्याचं पुढं आलंय. पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी मनिषादेखील पार्टीत उपस्थित होती. पोलिसांनी मनिषाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. तसंच रेव्ह पार्टीचा आयोजक विषय हांडा याला पोलिसांनी अटक केलीय. हांडा हा ओक वूड हॉटेलचा डायरेक्टर आहे.
-------------------------

रेव्ह पार्टीत पुणे वॉरियर्सचे दोन खेळाडूमुंबईत जुहूच्या ‘ओकवूड हॉटेल’मध्ये रेव्ह पार्टी करणाऱ्या १०० तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. धक्कादायक बाब म्हणजे, या पार्टीत राहूल शर्मा आणि वेन पार्नेल हे आयपीएलचे दोन खेळाडूही सहभागी झाल्याचं समोर आलंय.
--------------------------

आयपीएल… पार्ट्या, फिक्सिंग आणि छेडछाडआयपीएल मॅचनंतर सुरु होते मस्ती, बेधुंद खेळाडू, बेफिकीर वर्तन आणि मद्याची झिंग. हे सगळं पाहिलं की आयपीएलच्या मायाजालात सहभागी झालेल्या चेहऱ्यांचा संबंध जन्टलमेन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटशी असेल असं आपण म्हणू शकू का?
---------------------------

आयपीएलवर सट्टा, चार बुकींना अटकआय़पीएलवर सट्टा लावणा-या चौघांना अटक करण्यात आलीये. हे चारही बुकी असून त्यांनी श्रीलंकन खेळाडूंना पैसे दिल्याचा संशय आहे असा दावा एका इंग्रजी दैनिकानं केलाय.
---------------------------

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग !आयपीएलमध्ये फिक्सिंग सुरू असल्याचा खळबळजनक पुरावा हाती आला आहे. एका टिव्ही चॅनेलने हा पुरावा देताना स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आयपीएलमधील खेळाडू, आयोजक, मालक आणि भारतातील काही क्रिकेट जानकारांमध्ये फिक्सिंगची बोलणी होत आहेत.
----------------------------

‘बॅड बॉय’ मुनाफमुंबईच्या बॅड बॉईजमध्ये सर्वात अग्रेसर आहे तो मुनाफ पटेल... मुनाफनं मैदानावर आपल्या बेताल वागण्यानं अक्षरक्ष: थैमान घातलं.
----------------------------

शाहरुखला वानखेडेवर प्रवेश बंदीशाहरूखच्या धिंगाणा प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत शाहरुखला वानखेडेवर प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, सर्व चर्चेअंती निर्णय घेतला जाईल, असे आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे.
--------------------------

महिलेची छेडछाड, ल्यूक पॉमर्सबॅचला अटकआयपीएलमधील वादांची मालिका काही शमण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधीत्व करणारा ऑसी क्रिकेटर ल्युक पॉमर्सबॅचवर एका अमेरिकन महिलेची छेडछाड केल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
--------------------------

पॉमर्सबॅचची टीममधून हकालपट्टीमहिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ल्यूक पॉमर्सबॅच याच्यावर त्याच्या टीमनंही कारवाईची भूमिका घेतलीय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे मालक विजय माल्या यांनी पॉमर्सबॅचवर टीमकडून बंदी घालण्यात आली आहे, असं नुकतंच जाहीर केलंय.
--------------------------

मल्ल्यांच्या टीमकडून जीवे मारण्याची धमकीरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधीत्व करणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ल्यूक पॉमर्सबॅचवर एका अमेरिकन महिलेची छेडछाड केल्याच्या प्रकरणात पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी बंगळुरूचा संघ दबाव टाकत असल्याचे अमेरिकन महिलेने सांगितले आहे.
--------------------------

--------------------------

ती महिला मला खेटत होती- सिद्धार्थ मल्ल्याआयपीएलमध्ये सध्या फारच वाईट गोष्टी घडत आहे. काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पार्टीत ल्यूक पॉमर्सबॅचने महिलेची काढलेली छेड आणि त्यानंतर झालेली अटक यामुळे हा विषय चांगलाच गाजत आहे.
-------------------------

आयपीएल बंद करू नका- विलासरावशाहरूखला वानखेडेवर पाच वर्षांची बंदी घालण्याची घोषणा करणारे एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी आयपीएल बंदीला मात्र विरोध दर्शविला आहे. आयपीएल नवोदित खेळाडूंसाठी एक व्यासपीठ आहे.
-------------------------

IPL मध्ये काळा पैसा… एक दिवसाचं उपोषणभाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी आयपीएलच्या विरोधात आज एक दिवसाचं उपोषण केलं. आयपीएलमध्ये काळ्या पैशाचा वापर होत असल्याचा आरोप आझाद यांनी केला आहे.
------------------------
------------------------

अभिनेता शाहरुखचा वानखेडेवर धिंगाणाअभिनेता शाहरुख खान वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्यांने वानखेडे स्टेडियमवर धिंगाणा घातल्याने सर्वच हैराण झाले आहेत. मुंबई इंडियन्स आणि कोकलता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरू होता. त्यावेळी हा प्रकार घडला. शाहरूख प्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
------------------------

शाहरूखची चौकशी करणार – पोलीसवानखेडेवरील शाहरुख प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी शाहरुख खाननं ज्या मुलीला शिवीगाळ केली आणि मारहाण केलेल्या वॉचमनचा जबाब नोंदवून घेणार असल्याचं पोलीस सहआयुक्त इकबाल शेख यांनी म्हटल आहे.
-----------------------
First Published: Wednesday, May 30, 2012, 08:43