LIVE : देशात मोदींची लाट, बहुमतापेक्षा अधिक जागा

<B> <font color=red> LIVE :</font></b> देशात मोदींची लाट, बहुमतापेक्षा अधिक जागा
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दुपारी 5.19 वाजता अपडेट
- महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळण्याची शक्यता
- लक्षद्विप राष्ट्रवादी विजयी, बिहारच्या कटीहारमध्ये तारिक अन्वर आघाडीवर

दुपारी 4.40 वाजता अपडेट

- राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली
- लोकशाहीत विजय-पराजय होत असतो - सोनिया
- नव्या सरकारचे विजयाबद्दल अभिनंदन - सोनिया
- नव्या सरकारने देशाची एकता आणि अखंडता कायम राखावी - सोनिया


दुपारी 15.53 वाजता अपडेट

- हा ऐतिहासिक विजय - बाबा रामदेव
- दिग्विजय सिंग यांनी दिल्या मोदींना विजयाच्या शुभेच्छा, ट्विटरवर केलं ट्विट
- गोपाळ शेट्टी ४ लाख ४६ हजार मतांनी विजयी
- बारमती - सुप्रिया सुळे ७३ हचार मतांनी विजयी
- पालघर - चिंतामण वनगा अडीच लाख मतांनी विजयी









दुपारी 14.56 वाजता अपडेट
- हातकणंगले - राजू शेट्टींचा १ लाख ७७ हजार मतांनी विजयी
- रायगड - चुरशीच्या लढतीत अनंत गिते विजयी, ३ हजार मतांनी केला सुनील तटकरेंचा पराभव

दुपारी 14.36 वाजता अपडेट
- भिवंडी कपिल पाटील विजयी
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत विजयी
- मावळ - शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी, १ लाख ५० हजार मतांनी विजयी
- आम आदमी पार्टी पंजाबमध्ये चार ठिकाणी पुढे

दुपारी 14.30 वाजता अपडेट
- सहा राज्यांमध्ये काँग्रेसने खातेही उघडलं नाही.
- साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले विजयी, रिपाइंचे अशोक गायकवाड पराभूत
- उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पराभवाची जबाबदारी स्वीकारली. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर


दुपारी 14.23 वाजता अपडेट

- अमरावती - नवनीत कौर पराभूत, शिवसेनेचे आनंदराव आडसूळ विजयी
- अमृतसर - अरूण जेटली पराभूत, अमरिंदरसिंग विजयी
- विदिशा - सुषमा स्वराज विजयी
- राज्यवर्धन सिंग राठोड विजयी
- जालना - रावसाहेब दानवे २ लाख मतांनी


दुपारी 14.12 वाजता अपडेट

- नाशिक - मनसेचे डिपॉझीट जप्त, राज ठाकरे यांनी धक्का.
- दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विजयी
- उस्मानाबाद पद्मसिंह पाटील यांचा पराभव,
- कुरूक्षेत्रमधून नवीन जिंदाल पराभूत, तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
-









दुपारी 13.40 वाजता अपडेट
- मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उद्या, शनिवारी देशाला उद्देशून भाषण करणार
- मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरून विजयाच्या शुभेच्या दिल्या
- उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे गोपाळ शेट्टी तीन लाख मतांनी विजयी
- दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे विजयी
-



दुपारी 13.28 वाजता अपडेट





सकाळी 13.16 वाजता अपडेट

- कल्याणमधून श्रीकांत शिंदे २ लाख १५ हजार मतांनी विजयी
- नांदेड अशोक चव्हाण ६७ हजार मतांनी पुढे
-देशाच्या जनता वंशवादाच्या विरोधात मतदान केले - अडवाणी
- बीड गोपीनाथ मुंडे १ लाख ६१ हजार मतांनी आघाडीवर
- नगर - दिलीप गांधी ६६ हजार मतांनी आघाडीवर
-


दुपारी 13.11 वाजता अपडेट
- सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे ९० हजारांनी पिछाडीवर
- नाशिक - हेमंत गोडसे १ लाख ८७ हजार मतांनी विजयी
- नाशिक - सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा मानहानीकारक पराभव
- अजमेर सचिन पायलट पराभूत
- जळगाव - ए. टी. पाटील २ लाख ७५ हजार मतांनी विजयी
- रावेर - रक्षा खडसे १ लाख ५० हजार मतांनी विजयी
- दिंडोरी - हरिश्चंद्र चव्हाण २ लाख ४७ हजार मतांनी विजयी
- धुळे - सुभाष भांबरे विजयी



दुपारी 12.14 वाजता महाराष्ट्र अपडेट
- नारायण राणे उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा देणार
- तासाभरात देणार राजीनामा


दुपारी 12.14 वाजता महाराष्ट्र अपडेट
- बारामती सुप्रिया सुळे ३२ हजार मतांनी पुढे
- धुळे - सुभाष भांबरे २५ हजार मतांनी पुढे
- जळगाव - एटी पाटील १ लाख १५ हजार मतांनी पुढे
- कोल्हापूर - धनंजय महाडिक आघाडीवर
- नाशिक - भुजबळ १ लाख ८० हजार मतांनी मागे
- ठाणे - राज विचारे १ लाख १५ हजार मतांनी पुढे
- उत्तर पश्चिम मुंबई - गजानन किर्तीकर आघाडीवर
- नंदूरबार - हीना गावित ६० हजार मतांनी आघाडीवर

दुपारी 12.14 वाजता अपडेट
- पंजाबमध्ये आपने खाते उघडले
- नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले
- मोदींचे ट्विट India has won! भारत की विजय। अच्छे दिन आने वाले हैं
-


सकाळी 11.06 वाजता अपडेट
- नरेंद्र मोदी वाराणसीतून विजयी
- केजरीवाल वाराणसीतून पराभूत
- नरेंद्र मोदी वाराणसी आणि बडोद्यातून विजयी
- वाराणसीत आनंदोत्सव
-


सकाळी 11.06 वाजता महाराष्ट्र अपडेट
- यवतमाळ-वाशिम - तिसऱ्या फेरीअखेर शिवसेनेच्या भावना गवळी 8327 मतांनी आघाडीवर
- जालना - सहाव्या फेरीअखेरीस रावसाहेब दानवे ६०,२२२ मतांनी आघाडीवर
- नरेंद्र मोदी बडोद्यातून 5 लाख हजार मतांनी विजयी
- सातारा- उदयन राजे भोसले 19 हजार मतांनी आघाडीवर
- दक्षिण मध्य मुंबई - शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडीवर , 22110 यांची आघाडी
- माढ्यात सदाभाऊ खोत 9000 मतांनी आघाडीवर
- नागपूर - दुसऱ्या फेरीअखेरीस नितीन गडकरी ४२,००० मतांनी पुढे
- नाशिक - भुजबळ १ लाख ६० हजार मतांनी पिछाडीवर

सकाळी 10.58 वाजता अपडेट
- चंदीगडमध्ये किरण खेर आघाडीवर
- सीसाराम मीरा कुमार २० हजार मतांनी मागे
- चांदणी चौकमधून कपिल सिब्बल पराभूत
- हर्षवर्धन चांदणी चौकमधून विजयी

सकाळी 10.31 वाजता अपडेट
- भाजपच्या कार्यालयाबाहेर सेलिब्रेशन
- एनडीए-310, यूपीए-68 एआयडीएमके28 सप 12, बसप 8, तृणमूल–30, जेडीयू –1, डावे 14, आप -1, इतर 66 आघाडीवर
- बडोदा - भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदावार नरेंद्र मोदी 5 लाखांच्या मतांनी आघाडीवर
- दिल्लीत काँग्रेस कार्यालयाबाहेर घोषणाबाजी
- प्रियंका लाओ, देश बचाओ, राहुल विरोधात घोषणाबाजी



सकाळी 10.24 वाजता अपडेट
- ठाण्यातून शिवसेनेचे राजन विचारे आघाडीवर, तिसऱ्या फेरीत 27,890 मतांनी आघाडी
- वाराणसीतून ८ हजार मतांनी पुढे
- गांधीनगर मधून अडवाणी ९० हजार मतांनी पुढे
- अजमेर सचिन पायलट पिछाडीवर
- हाजीपूर रामविलास पासवान आघाडीवर
- बीड गोपीनाथ मुंडे आघाडीवर
- सुषमा स्वराज पिछाडीवर
-
सकाळी 10.00 वाजता अपडेट
- वरूण गांधी सुलतानपूरमधून विजयी
- विदिशामध्ये सुषमा स्वराज १५ हजार मतांनी
- अमेठीमधून राहुल गांधी आघाडीवर
- गुजरातमधून सर्व २६ जागांवर भाजप आघाडीवर
- काँग्रेसचे अजय माकन ६ हजार मतांनी मागे


सकाळी09.57 वाजता अपडेट
- सोलापूर २३ हजार मतांनी पिछाडीवर
- वडोदरा मोदी २.१५ लाख मतांनी आघाडीवर
- आझमगडमध्ये मुलायम सिंग तिसऱ्या क्रमांकावर
- रायबरेली सोनिया गांधी २० हजार मतांनी आघाडीवर
- कर्नाटक - शिमोगात येडीयुप्पा आघाडीवर
लखनऊ - राजनाथ सिंग आघाडीवर

- रत्नागिरी-सिंधुदुर्गातून तिसऱ्या फेरीतही विनायक राऊत 18 हजार 425 मतांनी आघाडीवर
- 9.51 - परभणी - संजय जाधव आघाडीवर, नागपूर - नितीन गडकरी पहिल्या फेरीअखेरीस 23,567 मतांनी आघाडीवर

- नाशिक -भुजबळ 34 हजार मतांनी पिछाडीवर, हेमंत गोडसे आघाडीवर

- 9.47 एनडीए-274 , यूपीए-87 एआयडीएमके18 सप 6, बसप 10, तृणमूल –10, जेडीयू –1, डावे 16, आप -1, इतर 36 आघाडीवर

- 9.38 - Ø वर्धा - रामदास तडस 9000 मतांनी आघाडीवर
Ø रामटेक - कृपाल तुमाले आघाडीवर

- 9.43– मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग बागपतमधून विजयी

- 09.41 AM | अपक्ष लढणारे जयवंत सिंह राजस्थान बाडमेरमधून आघाडीवर

- 9.36 – कल्याण श्रीकांत शिंदे २८ हजार मतांनी आघाडीवर

- 9.39 – पूनम महाजन १५ हजार मतांनी आघाडीवर

- 9:28 यवतमाळ-वाशिम शिवसेना भावना गवळी 1 हजार मतांनी - आघाडीवर

- 8.37 - बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आघाडीवर

- 8.37 - रायबरेलीतून काँग्रेसच्या सोनिया गांधी आघाडीवर

- 8.36 - 8.36 एनडीए-78 , यूपीएला -35 ,एआयडीएमके 5, सप 4, बसप 2 आणि इतर 10 जागेवर आघाडीवर

- 8.33 अमेठीतून काँग्रेसचे राहुल गांधी आघाडीवर

- 8.32 लखनऊमधून भाजप राजनाथ सिंह आघाडीवर

- 8.31 - पीलीभीतमधून भाजपच्या मनेका गांधी आघाडीवर

- 8.30 एनडीए-40 , यूपीएला -12 एआयडीएमके 3, सप 3, बसप 2 आणि इतर 5 जागेवर आघाडीवर

- 8.27 एनडीए-28 आणि यूपीएला -8 एआयडीएमके 2, सप 1, बसप आणि इतर 4 जागेवर आघाडीवर

- 8.27 एनडीए-40 , यूपीएला -12 एआयडीएमके 3 सप 3, बसप 2 आणि इतर 5 जागेवर आघाडीवर

- 8.20 एनडीएला - 19 आणि यूपीएला -6 आणि बसप 1 जागेवर आघाडीवर

- 8.14 - काँग्रेसच्या 4 उमेदवारांना आघाडी

- 8.12 - एनडीएला - 3 आणि युपीएला -1 जागेवर आघाडी ।

- 8.11- कर्नाटक - भाजपला पहिला कौल, भाजपचे उमेदवार आघाडीवर ।

- 8.30 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात

- पहिल्यांदा पोस्टल मतमोजणीला सुरुवात

- मतमोजणीला 8 वाजता सुरुवात

लोकसभा निवडणूक 2014 चा अंतिम टप्पा... म्हणजेच निकाल... देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निकालाची प्रत्येकालाच उत्सुकता लागलेली आहे.

थोड्याच वेळात म्हणजेच सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी देशभरात जय्यत तयारी करण्यात आलीय. देशभरात 989 मतमोजणी केंद्रांची स्थापना करण्यात आलीय.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 8251 उमेद्वारांचं भवितव्य पणाला लागलंय. यामध्ये, 1591 राष्ट्रीय पक्ष, 529 उमेदवार राज्यस्तरीय पक्ष, इतर पक्षांचे 2897 उमेदवार तर 3234 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 16, 2014, 06:46
First Published: Friday, May 16, 2014, 17:16
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?