www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदेशात आज 91 जागांसाठी मतदान होतंय. दरम्यान उमेदवारांसह पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मतदान हक्क बजावला आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्यावर बागपतमध्ये हल्ला झाला आहे, ते थोडक्यात बचावल्याचं सांगण्यात येतंय. सत्यपाल सिंह हे भाजपचे उमेदवार आहेत.
देशातल्या 14 राज्यांत 91 मतदारसंघांमध्ये आज मतदान झालं. 2014च्या लोकसभा निवडणुकीतला हा पहिलाच मोठा टप्पा होता. दिल्लीतल्या सर्व 7 जागांचा कौल मतदानयंत्रांमध्ये बंद झालाय.
एरवी मतदानासाठी फारशा उत्साही नसलेल्या दिल्लीकरांनी यावेळी भरभरून मतदान केलंय. दिल्लीत यंदा विक्रमी 64 टक्के मतदान झालंय. केरळमध्ये सर्वाधिक मतदान झालंय. देशभरात मतदानाची सरासरी टक्केवारी वाढल्याचं चित्र सध्यातरी दिसतंय. याचा फायदा कुणाला होईल, हे 16 मे रोजीच स्पष्ट होऊ शकेल.
भारतातील प्रमुख राज्यांमध्ये दिवसभरात झालेले सरासरी मतदानदिल्ली एकूण ६४ टक्के मतदान
गेल्या लोकसभेला ५२ टक्के मतदान
विधानसभा निवडणुकीत ६६ टक्के मतदान
चांदनी चौक – ६५.१ टक्के
उत्तर पूर्व दिल्ली – ६६.६ टक्के
पूर्व दिल्ली - ६४ टक्के
नवी दिल्ली ६५.९ टक्के
उत्तर पश्चिम दिल्ली – ६१.२ टक्के
पश्चिम दिल्ली – ६४.४ टक्के
दक्षिण दिल्ली – ६३ टक्के
उत्तर प्रदेश मतदारसंघ – १०
एकूण ६५ टक्के मतदान
गेल्या लोकसभेला ५१ टक्के मतदान
अलीगड – ६०.०४ टक्के
मेरठ – ६३.६८ टक्के
मुज्जफरनगर – ६७.७८ टक्के
श्यामली – ७०.८५ टक्के
सहारनपूर – ७०.६४
जम्मू आणि काश्मीर एकूण ६६.२९ टक्के मतदान
गेल्या लोकसभेला ४९.७१ टक्के मतदान
सांबा – ७०.२१ एकूण ६५ टक्के मतदान
गेल्या लोकसभेला ५१ टक्के मतदान
सांबा – ७०.२१ टक्के
जम्मू – ६५.२७ टक्के
पूँछ – ५७ टक्के
मध्यप्रदेश एकूण ५५.९८ टक्के मतदान (पाच वाजेपर्यंत)
गेल्या लोकसभेला ५३.८२ टक्के मतदान (९ मतदारसंघात)
महाराष्ट्र एकूण ६२.३६ टक्के मतदान
गेल्या लोकसभेला ५५.७० टक्के मतदान
अमरावती – ६५ टक्के
रामटेक – ५५.५४ टक्के
नागपूर – ५२.२० टक्के
यवतमाळ -६०.१० टक्के
चंद्रपूर – ६५.१० टक्के
अकोला – ६५ टक्के
भंडारा-गोंदिया – ६१ टक्के
वर्धा – ६४ टक्के
गडचीरोली – ६१ टक्के
बुलडाणा – ५८.६६ टक्के
छत्तीसगड एकूण ५१.४९ टक्के मतदान
गेल्या लोकसभेला ४७.३३ टक्के मतदान
लक्षद्विप एकूण ८० टक्के मतदान
गेल्या लोकसभेला ८५.५८ टक्के मतदान
हरियाणा एकूण ६५ टक्के मतदान (पाच वाजेपर्यंत) ७३ टक्के जाण्याची शक्यता
गेल्या लोकसभेला ६७.९ टक्के मतदान
चंदीगड एकूण ७४ टक्के मतदान
गेल्या लोकसभेला ६४ टक्के मतदान
झारखंडएकूण ५८ टक्के मतदान
गेल्या लोकसभेला ५१ टक्के मतदान
ओडिशाएकूण ६७ टक्के मतदान
गेल्या लोकसभेला ६५.३ टक्के मतदान
बिहार एकूण ५५ टक्के मतदान
गेल्या लोकसभेला ४१.६४ टक्के मतदान
दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानदिल्ली – ५२ टक्के
गुडगाव – ४८ टक्के
गाझियाबाद – ३५ टक्के
मध्यप्रदेश – नऊ मतदार संघात ३६.८१ टक्के
केरळ – ४० टक्के
झारखंड – चार मतदारसंघात ५१ टक्के
उत्तरप्रदेश – १० मतदारसंघात ५१ टक्के
बिहार – सहा मतदार संघात ३८ टक्के
लक्षद्विप – २५ टक्के मतदान
दिवसभरातील घडामोडी आणि मतदानाची माहिती- झारखंडच्या चतरा मतदान केंद्रावर बॉम्ब मिळाला, बॉम्ब डिफ्यूज करण्यात यश
- बागपतमध्ये भाजप उमेदवार आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपालसिंह यांच्यावर हल्ला
- दिल्लीत दुपारी 3 पर्यंत 51 टक्के मतदान
- केरळमध्ये दुपारी एकपर्यंत 35 टक्के मतदान
- दिल्लीत दुपारी एकपर्यंत 40 टक्के मतदान
- दिल्लीत पहिल्या दोन तासात झालं होतं 10 टक्के मतदान
- प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वढेरा यांनी मतदान केलं
- दिल्लीच्या औरंगजेब लेन बूथवर राहुल गांधींचं मतदान
- नवी दिल्ली काँग्रेस उमेदवार अजय माकन यांनी मतदान केलं
- संरक्षण मंत्री ए के एंटनींनी मतदान केलं
- दिल्लीच्या निर्माण भवनात सोनिया गांधी यांचं मतदान
- मध्य प्रदेशातील छिंदवाड्यात केंद्रीय मंत्री कमल नाथ यांचं मतदान
- सरसंघचालक मोहन भागवत, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांनी नागपुरात मतदान केलं.
- केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचं मतदान
- चंदीगडमध्ये अभिनेत्री गुल पनाग आणि अभिनेत्री किरण खेर यांचं मतदान
- किरण बेदींनी बजावला मतदानाचा हक्क
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 10, 2014, 16:14