शेवटच्या दिवशी मतदार झाले जागे!

शेवटच्या दिवशी मतदार झाले जागे!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्यामध्ये रविवारी राबवण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळालाय. एकाच दिवशी तब्बल ६ लाख ८८ हजार नागरिकांनी मतदार नोंदणी केलीय.

निवडणूक आयोगानं ही विशेष मोहीम राबवली होती. याआधी केलेल्या मतदार नोंदणीमध्ये चार लाख मतदारांनी नाव नोंदवलं होतं. यंदा मतदार नोंदणी केलेल्या ६.८८ लाख मतदारांपैकी जवळपास चार लाख मतदार १८ ते २२ वयोगटातले आहेत.

यंदा राज्यामध्ये मतदारांची संख्या ५८ लाखांनी वाढलीय. त्यामध्ये ३६ लाख पुरुष आणि २२ लाख महिला मतदारांचा समावेश आहे.

मुंबई विभागामध्ये तब्बल १.६१ लाख मतदारांनी नाव नोंदणी केलीय. येत्या २४ मार्चपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 12, 2014, 12:18
First Published: Wednesday, March 12, 2014, 12:18
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?