राज्यात पहिल्या टप्प्यात ६२.३६ टक्के मतदान

राज्यात पहिल्या टप्प्यात ६२.३६ टक्के मतदान
www.24taas.com, वृत्तसंस्था, नागपूर

विदर्भात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळालाय. सरासरी सुमारे ५५.७० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, सायंकाळी गर्दी वाढल्याने काही ठिकाणी ६.३० वाजेपर्यंत मतदान सुरु होते. राज्यात पहिल्या टप्प्यात ६२.३६ टक्के मतदान झाले. या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी नक्षल्यांचे हल्लेही परतविलेत. काही ठिकाणी नावे नसल्याने गोंधळ दिसून आला.

विदर्भातल्या दहा लोकसभा मतदारसंघात मतदान नक्षली हल्ला वगळता शांततेत पार पडलं. मात्र, काही ठिकाणी नविन मतदारांचे मतदार यादी नाव होते. तर काहींकडे मतदान कार्ड असूनही त्यांना मतदान करता आले नव्हते. त्यामुळे गोंधळाचे वातावरण काही मतदान केंद्रावर दिसून आले. अमरावतीमध्ये हा प्रकार पाहायला मिळाला.

विदर्भामध्ये मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिलाय. विदर्भात अंदाजे ५८ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळच्या तुलनेत हे मतदान दोन ते तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मतदारसंघांमध्ये सरासरी 54.13 टक्के मतदान झालंय... एकट्या नागपूरमध्ये मतदानाची टक्केवारी वाढलीये. भंडारा, बुलडाणा, यवतमाळमध्ये टक्केवारी कमी झालीये. तर अन्य मतदारसंघांमध्ये साधारणतः 2009 इतकीच टक्केवारी राहिलीये... गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता मतदारांनी उत्साहात मतदान केलं...

महाराष्ट्रात मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात विदर्भातल्या मतदारांनी जोरदार प्रतिसाद देत मतदानाबाबत एक सकारात्मक संदेश राज्यात दिलाय. विदर्भात 62.36 टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळच्या तुलनेत हे मतदान जवळपास साडे सहा टक्क्यांनी वाढलंय. विदर्भात असलेल्या रणरणत्या उन्हातही मतदारांनी केंद्रांवर रांगा लावत मतदान केलं. विदर्भातल्या मतदारसंघांमध्ये नागपूरमध्ये मतदानाची टक्केवारी वाढलीये. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता मतदारांनी उत्साहात मतदान केलं...

विदर्भामध्ये मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिलाय. विदर्भात अंदाजे ५८ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळच्या तुलनेत हे मतदान दोन ते तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मतदारसंघांमध्ये सरासरी 54.13 टक्के मतदान झालंय... एकट्या नागपूरमध्ये मतदानाची टक्केवारी वाढलीये. भंडारा, बुलडाणा, यवतमाळमध्ये टक्केवारी कमी झालीये. तर अन्य मतदारसंघांमध्ये साधारणतः 2009 इतकीच टक्केवारी राहिलीये... गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता मतदारांनी उत्साहात मतदान केलं...

दरम्यान, नितीन गडकरी, विलास मुत्तेमवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह सर्व उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला. तर गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या धमक्यांना जनतेचं मतदार यंत्रातून प्रत्युत्तर दिलं आहे. सर्वसामान्य मतदारांच्या उत्साहात भर घातली ती त्यांच्या नेत्यांनी. नागपूरमधून पहिल्यांदाच लोकसभा लढणारे नितीन गडकरी आणि गेल्या सहा टर्म खासदार असलेले विलास मुत्तेमवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

तर भंडारा-गोंदियामध्ये विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सहकुटुंब मतदान केलं. त्यांच्या पत्नी वर्षाबेन आणि मुलगी पूर्णा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. तर त्यांच्याशी दोन हात करणारे भाजपचे नाना पटोले यांनीही मतदान केलं. देशात परिवर्तवनाची लाट असल्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचं पटोले म्हणाले.

नागपूरमध्ये सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाला सुरूवात झाली. सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत शहरी भागात कमी प्रमाणात मतदान पाहायला मिळालं. ९ नंतर मात्र मतदानाचा जोर वाढलेला दिसला. दुपारी एक वाजेपर्यंत २६ टक्के मतदान झालं. त्यानंतर उन्हामुळे वेग मंदावला होता. मात्र संध्याकाळी ४ नंतर पुन्हा एकदा मतदानाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला. नागपूरमध्ये काही ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता न आल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या. मात्र त्या व्यतिरिक्त कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही.

रामटेक मतदारसंघाचा बहुतांश भाग हा शेतीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या गटात येतो. ग्रामीण भाग असलेल्या या मतदारसंघात यावेळी मतदानाचा चांगला उत्साह पाहायला मिळाला. दुपारी एक वाजेपर्यंत २५ टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळालं. ५ वाजेपर्यंत ४८ टक्के मतदान झालं होतं. दुपारी उन्हाचा कडाका वाढला होता तरीही ग्रामस्थ मतदान केंद्रांवर येत असल्याचं चित्र होतं.

गोंदिया-भंडा-यामध्ये सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याय होत्या. साडेसोळा लाख मतदारांनी २६ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद केलं. भंडारा मतदार संघातले भाजपचे उमेदवार नाना पटोले यांनी पूजाअर्चा करुन सहपरिवार मतदान केलं. प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल यांनीही १२ वाजण्याच्या सुमारास मतदान केलं.

सकाळी जोरदार सुरवात मतदानाला झाली मात्र दुपारी २ वाजता पासून मात्दात्यांचा जोर ओसरला. उन वाढल्याने व मतदार यादीत अनेकांची नावे नसल्याने मतदान वाढले नाही. शहरी भागात मतदान कमी तर ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी चांगली आहे. चंद्रपूरमध्येही सकाळपासून मतदारांचा उत्साह चांगला दिसत होता.

विशेष म्हणजे सकाळपासून तरूणांचा सहभाग चांगला होता. सोशल मीडिया वापरणा-या तरूणांचा सहभाग यावेळी चांगला दिसत होता. १२ वाजेपर्यंत मतदानाचा जोर चांगला होता. मात्र त्यानंतर उन्हाचा तडाखा वाढल्यावर मात्र मतदानाची टक्केवारी घसरली. मात्र चार वाजल्यानंतर पुन्हा मतदानाने जोर पकडला. ४ नंतर परत मतदानकेंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

गडचिरोलीत आदिवासी बहूल भागात मतदानाचा चांगलाच जोर होता. मतदारसंघातल्या ४ विधानसभा क्षेत्रात दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान झालं. दरम्यान नक्षलप्रभाव असलेल्या या मतदारसंघात गडदेवाडा या ठिकाणी मतदानपथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्त्युत्तर देत हा हल्ला परतवला.

वर्धा मतदार संघातही सकाळी सात वाजल्यापासून मतदानाचा चांगला उत्साह पाहायला मिळाला. ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण होतं. शहरी भागात मात्र सकाळी नऊनंतरच मतदार घराबाहेर पडायला सुरूवात झाली. दुपारी एकनंतर उन्हाचा तडाखा वाढला होता. त्यामुळे मतदानकेंद्रांवर तुरळक रांगा होत्या. मात्र दुपारी चार नंतर पुन्हा एकदा मतदानाचा जोर वाढला. वर्ध्यात चार गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. पहिलामपूर, डिचोली, शिवणगाव, आनंदगाव या गावातल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.

अमरावती मतदारसंघात आज चांगलं हवामान होतं. त्यामुळे मतदानकेंद्रावर सकाळपासून मतदारांची गर्दी पाहायला मिळत होती. दुपारी ३ वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झालं होतं. यावेळी मतदान केंद्रावर तरूण मतदारांचा उत्साह चांगला पाहायला मिळत होता. मतदारयादीत प्रचंड घोळ असल्याचा आरोप करत अमरावतीमध्ये मतदान केंद्रावर शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार गोंधळ घातला.

अमरावती मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी मतदान केलं. कौर यांची लढत महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसुळ यांच्याशी आहे. राणा यांची उमेदवारी सुरवातीपासूनच वादग्रस्त ठरली होती.

विदर्भात ६२.३६ टक्के मतदान

लोकसभा मतदार संघानुसार झालेले मतदान
- अमरावती – ६५
- रामटेक – ५५.४५
- नागपूर – ५२.२०
- यवतमाळ -६०.१०
- चंद्रपूर – ६५.१०
- अकोला – ६५
- भंडारा-गोंदिया – ६१
- वर्धा – ६४
- गडचीरोली – ६१
- बुलडाणा – ५८.६६


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 10, 2014, 20:45
First Published: Thursday, April 10, 2014, 22:48
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?