www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली निवडणुकीसाठी फंड गोळा करण्यासाठी आपने `डिनर विथ केजरीवाल` हा फंडा काढला. पण केजरीवाल यांच्यासोबत डिनर करायचं असेल तर आपल्या खिशातून तब्बल १० हजार रूपये मोजावे लागणार आहेत.
अरविंद केजरीवाल आज मुंबईत आहेत... तर १३ आणि १४ मार्चला विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान केजरीवाल चंद्रपूर, नागपूर, या शहराचा दौरा करणार आहेत.
`डिनर विथ केजरीवाल` या उपक्रमासाठी आत्तापर्यंत ६० जणांनी नोंदणी केलीय. सुमारे १५० जणांना या खास `डिनर`साठी आमंत्रित करण्याचं लक्ष आपकडून ठेवण्यात आलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 12, 2014, 10:25