सनीच्या रॅलीत तरूणाचा मृत्यू

सनीच्या रॅलीत तरूणाचा मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, संगरूर

बॉलीवुड स्‍टार सनी देओलने पंजाबमधील अकाली-भाजपचे उमेदवार सुखदेव सिंह ढिंडसा यांच्यासाठी प्रचार केला. या प्रचारात झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक तरुण जखमी झाला आहे.

सध्या निवडणुकीच्या प्रचारात सेलिब्रिटींना घेऊन प्रचार करण्याचा फंडा जोरात चालतोय. संगरूर लोकसभेच्या जागेसाठी सुखदेव सिंह ढिंडसायांचा सनी देओलसोबत प्रचार सुरू होता. या प्रचार रॅलीत तरूण मोठ्या प्रमाणात बाईक घेऊन सहभागी झाले होते.

या वेळी एक बाईक आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात तरूणाचा मृत्यू झाला, तर एक तरूण जखमी झाला. विशेष म्हणजे या प्रकारानंतर पीडित परिवाराला कोणीच सहानभूती दाखवली नाही. या उलट रोड शो हा सुरूच राहिला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 28, 2014, 17:16
First Published: Monday, April 28, 2014, 17:16
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?