काँग्रेस भवनमध्ये अजित पवारांची एन्ट्री

काँग्रेस भवनमध्ये अजित पवारांची एन्ट्री
www.zee24taas.com, झी मीडिया, पुणे

राष्ट्रवादीची नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज तब्बल १५ वर्षांनी काँग्रेस भवनमध्ये आले होते. निमित्त होते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच नगरसेवकांचा मेळाव्याचे. काँग्रेस भवनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर अजित पवार काँग्रेस भवनमध्ये येण्याचा योग तब्बल वर्षांनंतर आला. काँग्रेसचे उमेदवार पतंगराव कदम यांची शिष्टाई त्यासाठी कामी आली. निवडणुकीत विश्वजीत कदम यांना विजयी करण्यासाठी आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन अजित पवारांनी या मेळाव्यात केले.

कलमाडी गटाच्या भूमिकेविषयी संभ्रम असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकजुटीने काम करणे विश्वजीत कदमाच्या फायद्याचे आहे. ती गरज ओळखून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र लोकसभेची उमेदवारी नाकारले गेलेले आमदार विनायक निम्हण आणि त्यांचा नगरसेवक मुलगा सनी निम्हण हे या मेळाव्याला आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी सक्रीय झाली असली तरी विश्वजीत कदम यांच्या समोरील पक्षांतर्गत आव्हान कायम असल्याचे चित्र दिसून आले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 21, 2014, 23:28
First Published: Friday, March 21, 2014, 23:28
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?