www.24taas.com, झी मीडिया, मुंबई भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी मनसेला दिलेल्या धक्क्यामुळे शिवसेना चांगलीच सुखावलीय. राजनाथ सिंह यांनी लगावलेल्या टोल्यावरून काही तरी शिका, असा सल्ला शिवसेनेनं मनसेला दिलाय.
आपला निवडून येणारा प्रत्येक खासदार पंतप्रधानपदासाठी भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देणार, असं जाहीर करणाऱ्या राज ठाकरेंना राजनाथ सिंहांनी मात्र जोरदार धक्का दिला. मनसेला `बिनबुलाया मेहमान` म्हणत राज ठाकरेंना न `मागताच पाठिंबा कशाला?` असा सवालही राजनाथ सिहांनी केला होता. यानंतर मनसेकडून मात्र कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती.
शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी हाच मुद्दा उचलून धरत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उपदेशाचे डोस पाजलेत. `मोदींना पाठिंबा दिल्याचे जाहीर करून नागरिकांत संभ्रम निर्माण करू नका` असंही त्यांनी मनसेला सुनावलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 11, 2014, 16:05