मतदानासाठी ओळखपत्रांचे पर्याय वाढवले

मतदानासाठी ओळखपत्रांचे पर्याय वाढवले

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

निवडणूक ओळखपत्र उपलब्ध नसले तरीही मतदारांना विविध ११ छायाचित्र असलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही 1 ओळखपत्र दाखवून मतदारांना मतदान करता येणार आहे.

राज्यात लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यात १0 एप्रिल रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर , चंद्रपूर व यवतमाळ-वाशिम या मतदार संघात मतदान होणार आहे.

निवडणूक आयोगाने यासाठी पुढील पैकी कोणतेही एक छायाचित्र ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरले आहे.

पासपोर्ट, वाहन परवाना, केंद्र शासन/राज्य शासन/ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/ सार्वजनिक र्मयादित कंपन्यांनी त्यांच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे छायाचित्र ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँक/ पोस्ट खात्याचे पासबुक, पॅनकार्ड, आधार कार्ड, आर.जी.आय.ने एन.पी.आर अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयाचे स्वास्थ्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले सेवानवृत्तीचे कागदपत्र, निवडणूक विभागामार्फत देण्यात आलेली प्रमाणित छायाचित्र मतदार चिठ्ठी यांपैकी कोणताही एक पुरावा दाखवून आपण मतदान करता येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 9, 2014, 16:15
First Published: Wednesday, April 9, 2014, 16:15
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?