'आम आदमी' आज मुंबई दौऱ्यावर...

`आम आदमी` आज मुंबई दौऱ्यावर...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ते मुंबईत येत आहेत.

सकाळी साडे दहाच्या सुमारास केजरीवालांचं मुंबईत आगमन होईल. त्यानंतर विमानतळ ते अंधेरी स्टेशन असा ऑटो रिक्षाने प्रवास करतील. यानंतर अंधेरी स्टेशनवरुन लोकलने ते चर्चगेटला जातील. पक्षांतर्गत बैठक झाल्यानंतर दुपारी ३ ते ५ दरम्यान ऑगस्ट क्रांती मैदान, नागपाडा जंक्शन इथं ते रोड शो करणार आहेत.

मुंबईनंतर १३ आणि १४ मार्चला केजरीवाल नागपूरला जाणार आहेत. या रोड शोमध्ये केजरीवाल राज्यातील सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नावर बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

दिल्लीनंतर आपनं जास्त लक्ष महाराष्ट्रावर केंद्रीत केलंय. आपनं महाराष्ट्रात १६ उमेदवारांची घोषणा केलीय. इतर २० उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.


असा आहे केजरीवाल यांचा आजचा दौरा

* सकाळी १०.१५ : मुंबईत आगमन
* सकाळी १०.३० : विमानतळ ते अंधेरी स्टेशन ऑटो रिक्षानं प्रवास
* सकाळी १०.४० : अंधेरी स्टेशनवरून चर्चगेट लोकलनं प्रवास
* दुपारी ३ ते ५ : ऑगस्ट क्रांती मैदान, नागपाडा जंक्शन याठिकाणी रोड शो
* संध्याकाळी ५.३० ते ७ : मानखुर्द, अण्णाभाऊ साठे चौक, शिवाजी नगर सिग्नल, रमाबाई नगर रोड शो
* संध्याकाळी ७ : कन्नमवार नगरमध्ये रॅली




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 12, 2014, 09:44
First Published: Wednesday, March 12, 2014, 09:44
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?