अशोक चव्हाण नशीबवान, मी नाही - कलमाडी

अशोक चव्हाण नशीबवान, मी नाही - कलमाडी
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

काँग्रेसने खासदार सुरेश कलमाडी यांना लोकसभेची उमेदवारी दिली नसल्याने मतदान केल्यानंतर आज त्यांनी अघड नाराजी व्यक्ती केली. मी माजी मुख्यमंत्री सुरेश कलमाडी यांच्यासारखा नशीबवान नाही.

मुंबईतील आदर्श इमारत गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी मिळाली. ते नशीबवान ठरले, मात्र मी कमनशिबी ठरलो, अशी नाराजीची प्रतिक्रिया कलमाडी यांनी व्यक्त केली.

राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारामुळे सुरेश कलमाडी यांच्याऐवजी काँग्रेसने पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली. त्यानंतर उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर कलमाडी नाराज होते. त्यांनी नंतर कदम यांना पाठिंबा जाहीर केला.

पुण्यात मतदान होत असून, नागरिकांमध्ये उत्साह आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, काही ठिकाणी मतदान मशिनमध्ये गडब असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर काहींची नावे मतदार यादीत नसल्याने गोंधळ दिसून आला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 17, 2014, 13:03
First Published: Thursday, April 17, 2014, 13:06
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?