नवनीत कौर-राणा यांच्या गाडीवर हल्ला

नवनीत कौर-राणा यांच्या गाडीवर हल्ला
www.24taas.com, झी मीडिया, अमरावती
अमरावतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत कौर-राणा यांच्या गाडीवर अज्ञात इसमांनी हल्ला केला आहे. नवनीत कौर यांचे पती आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या घरासमोर असलेल्या कारच्या काचा फुटल्याचे आज सकाळी लक्षात आले.

नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच अनेक जण त्याच्या विरोधात कारस्थान रचत होते. अशा प्रकारे हल्ला करून त्यांनी शहरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावावा आणि आरोपींना शोधून काढावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केली आहे.

या प्रकरणी राणा यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना अशी शंका अमरावतीकरांनी व्यक्त केली आहे.

अमरावतीकरांनी उपस्थितीत केलेले प्रश्न

१) राणा आमदार असून त्यांच्या घरासमोर साधा चौकीदारही नाही का?

२) गाडी फोडत असताना चौकीदार कुठे होता?

३) राणा यांना चौकीदाराचा पगार परवडत नाही का?

४) गाडी फोडत असल्याचे सीसीटीव्ही फूटेज का नाही?

५) हा हल्ला आहे की स्टंटबाजी?
नवनीत कौर-राणा यांच्या गाडीवर हल्ला


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 5, 2014, 19:41
First Published: Wednesday, March 5, 2014, 20:48
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?