वाईट भाषा ही काँग्रेसची संस्कृती नाही - राहुल गांधी

वाईट भाषा ही काँग्रेसची संस्कृती नाही - राहुल गांधी
www.24taas.com, झी मीडिया, गाझियाबाद

राहुल गांधी यांनी इम्रान मसूद यांनी ६ महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींविषयी विधान केलं असल्याचं म्हटलंय.

मात्र काँग्रेसची वाईट भाषा वापरण्याची संस्कृती नसल्यांचंही त्यांनी सांगितलंय. 

राहुल गांधी यांची गाझीयाबादमध्ये जाहीर सभा झालीय यावेळी ते बोलत होते.

मोदींना धमकी देणाऱ्या इमरान मसूदला 14 दिवसांची कोठडी

लखनऊमधील काँग्रेसचे उमेदवार इमरान मसूद यांना पोलिसांनी अटक केली आहे. मसूद यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नरेंद्र मोदींची खांडोळी करु, अशी धमकी इमरन मसूद यांनी दिली होती. सहारनपूर पोलिसांनी रात्री साडे तीनच्या सुमारास इमराम मसूद यांना अटक केली

उत्तरप्रदेशात गुजरात करण्याचा प्रयत्न केला तर मोदींच्या खांडोळ्या करू असं, इमरान मसुद यांनी म्हटलं होतं.

एका चौकातील प्रचारसभेत बोलत असताना मसूद यांनी उत्तरप्रदेशचा गुजरात करण्याचा प्रयत्न केलात तर खांडोळी करु, अशी धमकी नरेंद्र मोदी यांना इमरान मसूद यांनी दिली होती.

तसेच तुम्ही मला खासदार केलं तर लहान मुलालाही पोलीसांची भिती वाटणार नाही, अशी दहशत निर्माण करु, असंही मसूद बोलले आहेत.

यूपीत ४२ टक्के तर गुजरातमध्ये फक्त ४ टक्के मुसलमान आहेत, असंही जातीचं गणित इमरान मसूद यांनी लावलं होतं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 29, 2014, 23:43
First Published: Saturday, March 29, 2014, 23:43
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?