आडवाणींसाठी... सेनेचे भाजपला उपदेशाचे डोस!

आडवाणींसाठी... सेनेचे भाजपला उपदेशाचे डोस!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आडवाणींच्या उमेदवारीवरुन शिवसेनेनं भाजपला खडे बोल सुनावलेत. गोष्ट छोटी, दुर्घटना मोठी या सामन्यातल्या अग्रलेखातून सेनेनं भाजपला कानपिचक्या दिल्यात.

`लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठांशी जनतेचे नाते तुटलेले नाही. सध्या राजकारणात घडत असलेल्या भल्याबुर्‍या प्रसंगांच्या तुलनेत आडवाणींची गोष्ट छोटी वाटत असली तरी दुर्घटना मोठी घडू शकते. वेळ निघून गेल्यावर ताळ्यावर येण्यात अर्थ नसतो हे कुणीच विसरू नये` असं म्हणत सामना या वर्तमानपत्राद्वारे सेनेनं आपल्या मित्रपक्षाला उपदेशाचे डोस पाजलेत.

यावेळी, काँग्रेसवर टीका करण्याची संधीही सेनेनं गमावली नाहीय. `कुटुंबप्रमुख पित्याकडून घराची चावी हिसकावून घेताना त्याला थप्पड लगावून वृद्धाश्रमात पाठविण्याचा प्रयत्न करणे हे कसले संस्कार आहेत?` असा सवाल आडवाणींच्या बाबतीत काँग्रेसने करावा हे हास्यास्पदच आहे. कॉंग्रेसने ज्येष्ठांच्या मानसन्मानाच्या गप्पा मारू नयेत` असं यामध्ये म्हटलंय.

`भाजपमध्ये मोदीयुग सुरू झाले आहे, पण...`

लालकृष्ण आडवाणी यांच्याबाबत निर्णय घेण्यास पक्षाने इतका उशीर का लावावा? असे करणे हा त्यांचा अपमान आहे. जर मोदी, राजनाथ व अरुण जेटली आपापल्या पसंतीच्या मतदारसंघात लढू शकतात, मग मी का नाही? हा त्यांचा सवाल आहे व शेवटी राजनाथ सिंग यांना जाहीर करावेच लागले की, ‘‘आडवाणी हे त्यांना हवे तिथून लढू शकतात!’’ राजकीय पक्षात अनेकदा भलेबुरे प्रसंग घडत असतात, पण आडवाणी यांच्या बाबतीत जे घडवले जात आहे व त्यासाठी जी पटकथा पडद्यामागून लिहिली जात आहे त्याचा जनमानसावर परिणाम होऊ शकतो.

आडवाणी यांनी जे शिखर गाठले आहे त्यामागे त्यांचा संघर्ष व त्याग आहे. आडवाणी यांचे राजकीय चारित्र्य हे कमालीचे शुद्ध आहे व त्यांचे विरोधकही त्यांच्यावर शिंतोडे उडवू शकले नाहीत. आडवाणी हे नव्वदीकडे झुकले असले तरी वाढलेले वय हा अडथळा नसून त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळेच त्यांना अडगळीत टाकून मनमानी करणे कुणाला जमलेले नाही. वडीलधारे म्हणून त्यांचे स्थान मोलाचे आहे व ते तसेच राहील.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 22, 2014, 11:16
First Published: Saturday, March 22, 2014, 11:23
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?