भाजप अध्यक्षपदाची माळ नितीन गडकरींच्या गळ्यात?

भाजप अध्यक्षपदाची माळ नितीन गडकरींच्या गळ्यात?
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना आयकर विभागानं क्लीन चिट दिल्यानंतर आता त्यांची पुन्हा एकदा भाजपच्या अध्यक्षपदी फेरनिवड होण्याची शक्यता वर्तवली जातेय. सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर आणि एक्झिट पोलच्या निष्कर्षानंतर भाजपने सत्ता स्थापनेच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत.

भाजपाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्यावेळी आयकर विभागानं गडकरी यांच्या कार्यालयावर छापे मारले होते..त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माघार घेतं राजीनामा दिला होता.पण आता मात्र गडकरी यांच्यावर कोणतंही प्रकरण प्रलंबित नसल्याचं खुद्द आयकर विभागानं स्पष्ट केलय. त्यामुळे गडकरी पुन्हा अध्यक्षपदी येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर आणि एक्झिट पोलच्या निष्कर्षानंतर भाजपने सत्ता स्थापनेच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींशी परदेशातून फोनवरुन चर्चा केलीय. एक्झिट पोलच्या निकालावर या दोघांमध्ये चर्चा झाल्याच सांगण्यात येत आहे.

नितीन गडकरींनी नरेंद्र मोदींची गांधीनगरमध्ये भेट घेतली. या भेटीत त्यांनी निकालानंतरच्या रणनितीवर चर्चा केली. बहुमत मिळालं तरी एनडीएत नवे मित्र जोडण्यावर भर असेल असं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं. तर सत्ता आल्यावर विरोधी पक्षांच्या राज्यांनाही समान न्याय दिला जाईल असं ते म्हणाले.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 13, 2014, 11:12
First Published: Tuesday, May 13, 2014, 11:14
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?