www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीवादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप नेते गिरीराज सिंग यांच्यावर निवडणूक आयोगानं निर्बंध लादलेत. त्यांना बिहार आणि झारखंडमध्ये प्रचारास बंदी घालण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. तसंच त्यांना स्वतंत्र कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये.
गिरीराज सिंग यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या FIRची तातडीनं चौकशी करावी, असे आदेशही निवडणूक आयोगानं दिलेत. जे मोदींना विरोध करतायत, त्यांनी पाकिस्तानात जावं, असं गिरीराज यांनी एका सभेत म्हटलं होतं.
दरम्यान, गिरीराज सिंह यांच्या वक्तव्याशी कोणीच सहमत असू शकत नाही असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. सत्तेत आलेलं एनडीएचं सरकार हे एनडीला मत देणाऱ्यांचं असेल, विरोधात मतदान करणाऱ्यांचं असेल, इतकंच नव्हे तर कुणालाच मत न देणाऱ्यांचंही असेल असंही मोदींनी स्पष्ट केलं. शिवाय गिरीराज सिंह यांच्याकडून अशा बेजबाबदार वक्तव्याची अपेक्षा नव्हती अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी आपली खंत बोलून दाखविली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 22, 2014, 22:34