www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआज काल कोण कोणत्या पक्षात कधी जाईल याचा कोणताच भरवसा राहिलेला नाय हे.
माझ्या सारखा कार्यकर्ता बंडोजीराव उर्फ बंड्या, याने कितीबी दिवस संतरंज्या टाकल्या, पोस्टर चिटकवले तरी आपल्याला विचारतं कोणं?
कोणताबी पक्ष घ्या, यात सामान्य कार्यकर्त्याला काही स्थान नाही. आमी यांची सेवा तरी किती दिवस करायची. बरंय बंडू शिकलेला आहे म्हणून, नाही तर कसं समजलं असतं त्याला?
आम्हाला संधी नाही, याचं दुख नाही हो, पण ज्यांना संधी मिळते, ते संधी साधतात आणि दुसऱ्या पक्षात आणि संघटनेत मोठ मोठाल्या पदावर जाऊन बसतात.
माझ्या सारख्या कार्यकर्त्याला काय समजणार हे संधीसाधूचे राजकारण, आणि काही नाही, कितीही संधी साधू द्या, म्हणत्यात ना, `ये पब्लिक सब कुछ जान ती है`, फिरून फिरून हे खुंट्यावरच येणार, संध्याकाळी
रानातले जनावरं दिवस बसल्यावर घरी येतात ना तशीच. म्हणजे राजकारणात यांची परगती शून्यच.
मला बंड्याला याचा अनुभव आहे, आणि माझा अनुभव सांगतोय, जनता यांना धडा शिकीवणार आणि किव बी आपल्यालेच येणार...
पक्ष आणि विचार यांनी सरड्या सारखे सेकंदाला आणि मिनिटाला बदलावेत. ज्याच्यावर कधी टीका केली, त्यालाच गोंजारावं, हे काही जनतेला समजत नाय का?
धनुष्यवाला इंजिनची माणसं पळवणार आणि इंजिनवाला धनुष्यवाल्याची माणसं खेचणार, हे काय राजकारण झालं व्हयं?
अख्या महाराष्ट्राचा शेतकरी गारपीट झाल्याने कंबरडं मोडून पडलाय, हाय कुणाला काळजी, ज्याचं त्याचं आपलं चाललंय,
आपल्याला तिकीट, आपल्या माणसाला तिकिट, तो आपला माणूस, तो त्याचा, तो तेथून निवडून
येईल का? आणि तो निवडेल का?
अरे पांढऱ्या बगड्यांनो जरा वेळ काढा, माझ्या मायबाप शेतकऱ्यासाठी, आचार संहिता आहे, तर मग काय मदत नाही काय?, निवडणूक आयोगाचा सल्ला घ्या आणि करा मदत...
चला चाललो, भेटू पुन्हा....
मी बंडूराव झेंडू
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 10, 2014, 18:46