www.24taas.com, झी मीडिया, सारणआरजेडीमध्ये वेगळचं महाभारत रंगण्याची चिन्ह आहेत. राबडी देवी यांचे बंधू साधू यादव त्यांच्याच विरोधात समाजवादी पार्टीच्या तिकिटावर मैदानात उतरताहेत.
बिहारमधल्या सारण मतदारसंघात आता राबडी देवी आणि साधू यादव या भाऊ-बहिणांचा सामना रंगणारेय. राबडी देवी यांचे बंधू वावरतांना साधू यादव यांच्या कारवाया नेहमीच वादग्रस्त ठरल्या होत्या.
लालूप्रसाद यादव यांच्यावर साधू यादव यांच्या वागणूकीमुळं अनेकदा टिकाही होत होती. नंतर मात्र साधु यादव याचं राबडी देवी आणि लालूप्रसाद यादव यांच्याशी बिनसलं, आणि साधू यादव दूर गेले.
आता तर ते थेट समाजवादी पार्टीच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. या भाऊ बहिणींच्या लढतीमुळं आता सारण या मतदारसंघातील लढतही लक्षवेधी ठरणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 25, 2014, 19:04