'बाबा रामदेवांचे डोके आणणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस'

`बाबा रामदेवांचे डोके आणणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस`

www.24taas.com, झी मीडिया, चंदीगड

बहुजन समाज पक्षाचे उमेदवार भगवानसिंह चौहान यांनी बाबा रामदेवांचे डोके कापून आणणाऱ्याला एक कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केलीय.

योगगुरू बाबा रामदेव यांनी काही दिवसांपूर्वी दलितविरोधी वक्तव्य केलं होतं, यावरून भगवानसिंह चौहान यांनी हे वक्तव्य केलं आहे.

बाबा रामदेव यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करत ते दलितांच्या घरी हनीमून आणि पिकनिकसाठी जात असल्याचे वक्तव्य केले होते.

या वक्तव्यावरून त्यांच्यावर देशभरातून टीका करण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात दोन गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

या वक्तव्यानंतर होशियारपूर बस स्थानकाजवळ रामदेवबाबांचा पुतळा चौहान यांनी जाळला होता. त्यावेळी बाबा रामदेव यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर ते आजही कायम आहेत.

भगवानसिंह चौहान म्हणाले, की बाबा रामदेवांचं डोकं जो कोणी मला आणून देईल, त्याला मी एक कोटींचे बक्षीस देईन, माझ्या वक्तव्यात चुकीचे काय आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 6, 2014, 13:23
First Published: Tuesday, May 6, 2014, 13:23
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?