www.24taas.com, झी मीडिया, अमेरीका २४ तारखेला लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातलं तिसरा टप्प्यातलं मतदान होत आहे. यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपला. उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकणातली एक जागा आणि ठाणे जिल्ह्यातल्या एकूण १९ जागांवर २४ तारखेला मतदान होणार आहे. एकूण 338 उमेदवारांचं भवितव्य या मतदानानं निश्चित होणार आहे.
मुंबईतल्या सहा जागांवर काँग्रेसचा प्रभाव कायम राहणार का याचंही उत्ततर 24 तारखेच्या मतदानातून कळेल. तसंच नाशिकमध्ये छगन भुजबळ, औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे हे दिग्गजाचं भवितव्यही 24 एप्रिलला मतदान यंत्रात बंद होणार आहे
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. उमेदवारांनी आज मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर दिला. मतदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवारांनी केला. मोदींनी आज नंदुरबार आणि धुळ्यात सभा घेतली. नंदुरबारमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेस जिंकत आली आहे. त्यामुळं मोदींच्या सभेचा या मतदारसंघात किती प्रभाव पडणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 22, 2014, 20:09