www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीनरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आणि गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआयने अखेर क्लीनचीट दिली आहे. अमित शहा यांना इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणी क्लीनचीट देण्यात आली आहे.
इशरत जहाँ इन्काऊंटर प्रकरणपोलिसांनी 2004 मध्ये एका चकमकीत इशरत जहाँ सह चार लोकांना मारलं होतं. यात इशरत जहाँ या मुलीचा देखिल समावेश होता.
गुजरात पोलिसांनी हे चारही जण दहशतवादी होते, तसेच नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा यांचा होता असं सांगितलं.
हे प्रकरण कोर्टात आल्यानंतर कोर्टाने एक समिती बनवली आणि ही चकमक बनावट असल्याचं सांगितलं.
माववाधिकार आयोगानेही गुजरातमध्ये अनेक बनावट चकमकीत अनेकांना मारण्यात आल्याचं त्यावेळी सांगितलं होतं.
ज्येष्ठ पोलिस अधिकारी राजीव रंजन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती या प्रकरणी बनवण्यात आली, हा रिपोर्ट टीमने हायकोर्टाकडे सादर केला.
या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं, मिळालेल्या पुराव्यांवरून इशरत आणि तीन लोकांचा मृत्यू 15 जून 2004 रोजी झालेला नव्हता, मात्र पोलिसांचा दावा आहे की ही चकमक याच दिवशी झाली आणि यात चार जण मारले गेले.
कोर्टाने या प्रकरणी तपास यंत्रणेला या प्रकरणी नव्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
यात पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचेही आदेश होते. 2009 मध्ये या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली, यात पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला. एन्काऊंटर प्रकरणात दोन डझन पोलिस कर्मचाऱ्यांची नावं होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 7, 2014, 14:11