चंद्राबाबूंचं भाजपसोबत पुन्हा 'पॅचअप'

चंद्राबाबूंचं भाजपसोबत पुन्हा `पॅचअप`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

तेलुगु देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी भारतीय जनता पार्टी सोबत युती केल्याची घोषणा केली आहे. टीडीपी आणि बीजेपी आंध्र आणि तेलंगणात सोबत येऊन निवडणूक लढवणार आहेत.

दोन्ही पक्षांमध्ये मागील आठ दिवसांपासून जागावाटपावर चर्चा सुरू होती. यामुळे युती करण्यास अडचणी येत होत्या. कारण भाजपकडून जास्त जागांची मागणी होत होती.

सुत्रांच्या माहितीनुसार भाजपा सीमांध्रमध्ये 25 पैकी, पाच लोकसभा आणि 15 विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर तेलंगणात 17 पैकी 8 जागांवर लोकसभा आणि 47 जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

आंध्र प्रदेशात आणि तेलंगणात लोकसभेसह विधानसभेचीही निवडणूक पार पडणार आहे. तेलंगणा राज्य दोन जून रोजी अस्तित्वात येणार आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसम पार्टीने अटल बिहारी वाजपेयी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. या दोन्ही पक्षांनी 2004 मध्ये एकत्र निवडणूक लढवली, मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर दोन्ही पक्ष वेगळे झाले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 6, 2014, 15:34
First Published: Sunday, April 6, 2014, 17:52
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?