www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहाराष्ट्र पोलीस मुख्यालयामध्ये शरद पवार यांच्या विरोधात किरीट सौमय्या यांनी तक्रार दिली आहे. स्पेशल डीजी देवेन भारती यांची सोमयांनी भेट घेतली.
शरद पवार यांनी मतदानासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलीय.
शरद पवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील किरीट सौमय्या यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली.
निवडणूक आयोगाने पोलीसांकडून पवारांच्या नवी मुंबईत केलेल्या वक्तव्याबद्दल आहवाल मागवला असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 24, 2014, 18:30