नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे करीन - इम्रान मसूद

नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे करीन - इम्रान मसूद
www.zee24taas.com, झी मीडिया, लखनऊ

भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे केले जातील, असे धक्कादायक विधान काँग्रेसचे लोकसभा उमेदवार इम्रान मसूद यांनी केले आहे. त्यामुळे या विधानाने काँग्रेस आणि भाजपमध्ये नव्याने वाद उफाळणार आहे. मेसूद यांची भाषा घसरल्याने रायकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोदींनी प्रचाराचा धडाका लावला आहे. निवडणुकांच्या तारखा जवळ आल्याने लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सर्व पक्षांनी प्रचारात एकमेकांवर जोरदार हल्लाबोल आणि आक्रमक भाषा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र काँग्रेसचे उत्तर प्रदेशामधील सहराणपूर मतदारसंघातीली उमेदवार इम्रान मसूद यांची भाषा घसरल्याची दिसून आलेय.

इम्रान मसूद यांनी मोदी यांना ठार मारण्याचे धक्कादायक विधान एका जाहीर सभेत केले. मोदी यांचे तुकडे तुकडे करुन टाकेन, अशी जवळजवळ धमकीच दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगानेही या भाषणाची गंभीर दखल घेतली आहे. मसूद यांच्या भाषणाची निवडणूक आयोगाने चौकशी सुरु केली असून या भाषणाची माहिती मागविली आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश म्हणजे गुजरात नव्हे. गुजरातमध्ये केवळ ४ टक्के मुसलमान आहेत; परंतु उत्तर प्रदेशमध्ये २२ टक्के मुसलमान आहेत. मोदी यांना उत्तर कसे द्यायचे हे मला माहिती आहे. त्यामुळेच मी मोदींविरोधात लढणार आहे. आम्ही त्यांचे तुकडे करुन टाकू, असे धक्कादायक विधान मसूद यांनी केले. त्यांच्या भाषणाचा वादग्रस्त व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 28, 2014, 12:37
First Published: Friday, March 28, 2014, 13:11
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?