काँग्रेस उमेदवार अभिनेत्री नगमा यांनी श्रीमुखात भडकावली

काँग्रेस उमेदवार अभिनेत्री नगमा यांनी श्रीमुखात भडकावली
www.zee24taas.com, झी मीडिया, मेरठ

मेरठमध्ये काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्री नगमा यांनी अतिउत्साही कार्यकर्त्याच्या श्रीमुखात भडकावली. मेरठमध्ये सभेसाठी आलेल्या नगमा या कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकल्या होत्या.

यावेळी अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे नगमा यांना वाट काढणं कठीण झालं. त्याचवेळी एका कार्यकर्त्याने गैरवर्तन केल्याने नगमा यांचा पारा चढला आणि त्यांनी त्याच्या श्रीमुखात भडकावली. यावेळी नगमा यांनी या कार्यकर्त्याला खडे बोलही सुनावले. मत देण्याआधी महिलांचा आदर करायला शिका, असा सल्ला त्यांनी या कार्यकर्त्याला दिला.

गुरूवारी रात्री नगमा मेरेठ येथे प्रचार करत असताना गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेली. सभेच्या आयोजकांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही लोक त्यांचे ऐकायच्या मनस्थिती नव्हते. गोंधळात अनेकांनी नगमा यांच्या जवळ जाण्याचा आणि त्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी धक्काबुकीही झाली. हे पाहून नगमा यांनी तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी एकाने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे संतापलेल्या नगमा यांनी त्या युवकाला थप्पड लगावली.

नगमा निघून गेल्या, मात्र गर्दीतील लोक संतप्त झाले, तेथे अभूतपूर्व गोंधळ माजला. लोकांनी तोडफोड करण्यासही सुरूवात केल्याने गोंधळ अधिकच वाढला. त्यानंतर पोलिसांनी लोकांना काबूत आणण्याचा प्रयत्न केला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 28, 2014, 11:24
First Published: Friday, March 28, 2014, 16:58
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?