दोन्ही काँग्रेसने जातीपातीची पिलावळ पोसली - राज ठाकरे

दोन्ही काँग्रेसने जातीपातीची पिलावळ पोसली - राज ठाकरे
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष जातीपातीचे राजकारण करीत आहे. त्यांनीच जातीपातीची पिलावळ बोसली आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडीवर केली. त्याचवेळी महायुतीला लक्ष्य केले. मनसेचे पुण्यातील उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचार सभेत राज यांनी हल्लाबोल केला.

विनायक मेटे यांच्यासारख्यांना शिवसेना आणि अन्य पक्षांनी महायुतीत घेतले. त्याआधी ते राष्ट्रवादीचे होते. असे लोक हे काँग्रेस पोसत आहेत. हीच प्रवृत्ती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाई फेकण्यापर्यंत मजल मारली. या निषेध करावा तेवढा कमी आहे. एकमेकांवर जातीचे शिक्के मारून राजकारण केले जात असून, त्यातून आपण आपल्याच महापुरुषांची विटंबना करतो आहोत, असे वक्तव्य राज यांनी सोमवारी केले.

महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत जाऊन कोणत्याही प्रश्नावर भांडत नाहीत. निवडणुका आल्या की, जात बाहेर काढून मते मागतात. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार झाला. एखादी गोष्ट पटत नसेल, तर त्यांच्याशी बोला ते समजावून सांगतील. बाबासाहेबांचे शिवचरित्र ब्राह्मणी आहे, असे म्हणणाऱ्यांनी ते कधी वाचले आहे का? प्रत्येक इतिहास आता जातीतून पाहायचा का, असा सवाल राज यांनी यावेळी केला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 15:40
First Published: Tuesday, April 15, 2014, 15:48
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?