मोदी वादळातील पडझडीनंतर काँग्रेस नेत्यांचे राजीनामे

मोदी वादळातील पडझडीनंतर काँग्रेस नेत्यांचे राजीनामे

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नरेंद्र मोदी नावाच्या वादळात भले मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. यात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

राज्याची आगामी विधानसभा निवडणूक चार महिन्यावर येऊन ठेपली असल्याने, काँग्रेस नेत्यांनीही खुल्या दिलाने राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे.

काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनी राजीनामे देण्यास सुरूवात केल्याने, पृथ्वीराज चव्हाणंही राजीनामा देतील का?, याकडे सर्वांचं लक्ष्य लागून आहे. काँग्रेस नेते आणि मंत्री नारायण राणे यांनाही राजीनामा दिला आहे.

आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांचं पानिपत झाल्यानंतर राज्यात काँग्रेसच्या मंत्र्यांचं राजीनामासत्र सुरू झाल्यानं सरकार संकटात सापडलं आहे.

काँग्रेसशासित राज्याच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे पुढे केल्यानं महाराष्ट्र सरकारच्या भावी वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नीलेश राणे यांचा दारूण पराभव झाल्यानं त्यांचे वडील, राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिला आहे. त्याचवेळी, रोहयोमंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही आपला राजीनामा मुख्यमंत्र्याकडे पाठवला आहे.

सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजतं.

पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून हे सगळेच नेते राजीनामा देऊ लागल्यानं सरकारचं काय होणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 16, 2014, 18:41
First Published: Friday, May 16, 2014, 18:41
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?