जसवंत सिंहांचं बंड, बारमेरहून अपक्ष निवडणूक लढवणार

जसवंत सिंहांचं बंड, बारमेरहून अपक्ष निवडणूक लढवणार
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी अखेर राजस्थानमधील बारमेर मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केलाय. ते उद्या सोमवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर जसवंत सिंह यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार असलेले मानवेंद्र सिंह यांनीही पक्षाचं काम करणं अचानकपणे बंद केलंय.

अपक्ष म्हणून मी लोकसभेची निवडणूक लढणार आहे. बारमेर मतदारसंघातून मी उद्या माझा उमेदवारी अर्ज दाखल करील, असं जसवंत यांनी स्पष्ट केलंय. आपण काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.

बारमेर मतदारसंघातून जसवंत सिंह यांचा पत्ता कट करत भाजपनं रिटायर्ड कर्नल सोनाराम चौधरी यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळं जसवंत सिंह कमालीचे नाराज झालेत. भाजप या पक्षाचे दोन तुकडे पडले आहेत. असली भाजपवर नकली भाजपनं कब्जा मिळवलाय, असा घणाघात त्यांनी भाजपच्या विद्यमान नेतृत्वावर काल केला.

नाराज जसवंत सिंहांची समजूत काढली जाईल, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. मात्र पॅचअपच्या सगळ्या शक्यता आज खुद्द जसवंत यांनीच फेटाळून लावल्या आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 23, 2014, 13:03
First Published: Sunday, March 23, 2014, 13:03
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?