www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकाँग्रेस उपाध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे अघोषित पीएम पदाचे उमेदवार राहुल गांधी यांनी, काँग्रेसला कमी समजू नका असं म्हटलंय.
काँग्रेसला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २००९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
यावेळी ही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए ३ चं सरकार साकारलं जाणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, तसेच समविचारी पक्षांना सोबत घेऊन काँग्रेस पुढे चालणार असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
दहा वर्षांच्या सत्तेनंतर थोडीशी सत्ताविरोधी लहर असल्याचंही यावेळी राहुल गांधी यांनी सांगितलं.
काँग्रेस एक आव्हानात्मक लढाई लढायला सज्ज आहे, आणि आम्ही जास्तच जास्त जाका जिंकू असंही राहुल गाँधींनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेसने २००९ मध्ये, २०६ जागा जिंकल्या होत्या.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला
color="blue">फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.
First Published: Sunday, March 16, 2014, 18:38