चाहत्याने केला सवाल, राहुल भैया तुम्ही लग्न कधी करणार

चाहत्याने केला सवाल, राहुल भैया तुम्ही लग्न कधी करणार

www.24taas.com, झी मीडिया, अलाहाबाद

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना लग्न करण्यासाठी त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते आता प्रश्न विचारू लागले आहेत. असाच एक किस्सा अलाहाबादच्या एका सभेत घडला आहे. राहुल यांच्या एका चाहत्याने राहुल यांना सभेतच लग्नाचा प्रश्न विचारला. या प्रकाराचा राहुल यांनी हसत हसतच समाचार घेतला.

अलाहाबादमध्ये एका सभेत राहुल गांधी हे काँग्रेसच्या विकासाचा पाढा वाचत असतानाच, सभेतून एका व्यक्तीने राहुल यांना `हे तर ठीक आहे, पण राहुल भैया तुम्ही लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. या प्रश्नाने राहुल हे जरा थांबले, आणि मग हसतच राहुल यांनी हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला आणि जरा अजून थांबा मित्रांनो, असे उत्तर सभेला संबोधून दिले. या प्रकाराने राहुल सोबतच सगळ्या नेत्यांमध्ये आणि सभेला उपस्थीत लोकांमध्ये हसण्यासारखं वातावरण निर्माण झालं.

राहुल यांना तरुण मुला मुलींचा प्रतिसाद हा नेहमीच चांगला मिळतो. या कारणाने राहुल यांना नेहमीच लग्नासाठी लोकांकडून विचारणा होते. आपल्या भाषणानंतर राहुल यांनी लोकांमध्ये मिसळून त्यांना काँग्रेसकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 6, 2014, 11:22
First Published: Tuesday, May 6, 2014, 11:22
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?