www.zee24taas.com, झी मीडिया, मावळपुण्यातील मावळ लोकसभा मतदार संघात कोण निवडून येणार हे सांगता येत नसलं तरी तीन प्रमुख उमेदवारांमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी श्रीमंतीत मात्र बाजी मारलीय. श्रीरंग बारणे यांची एकूण मालमत्ता ६६ कोटी ९२ लाख रुपयांची असून, त्यांच्याकड एक रिव्हॉल्वरही आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर दुस-या क्रमांकावर आहेत. त्यांची मालमत्ता सात कोटी ८१ लाख ५६ हजार ७६१ रुपये आहे तर पत्नीच्या नावे २ कोटी बावीस लाख ९३ हजार ७२३ रुपयांची अशी एकूण १० कोटीहून अधिक मालमत्ता नार्वेकारांकड आहे.
शेतकरी कामगार पक्ष आघाडीचे लक्ष्मण जगताप हे सहा कोटी ३७ लाख २९ हजार २८६ रुपयांचे मालक आहेत. त्यांच्याकड ही दोन रिवोल्वर आहेत. जगताप आणि बारणे यांच्याकड रिवोल्वर असल्यानं नार्वेकर यांनी मात्र दोघांना चिमटा काढत, माझ्याकड रिवोल्वर नाही पण पेन आहे, आणि जनतेला पेन हवे आहे रिवोल्वर नाही अशी टीका त्यांनी केलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, March 28, 2014, 09:42