www.24taas.com, झी मीडिया, ठाणेठाण्यात खोपटच्या मतदान केंद्रावर एका निवडणूक अधिकारी महिलेचा मृत्यू झालाय. वैशाली भावे असं या ३५ वर्षीय महिलेचं नावं असून त्या न्यू बॉम्बे सिटी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका होत्या.
ठाणे मतदारसंघातील खोपट सिग्नलजवळच्या एस. टी. वर्कशॉप केंद्रावर ही घटना घडली. वैशाली भावे या मतदान केंद्रावर ड्युटीवर होत्या. अचानक चक्कर आल्यानं त्या जमिनीवर कोसळल्या.
त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 24, 2014, 20:56