दीपक केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, तर बाळा भिसेंची हकालपट्टी

दीपक केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, तर बाळा भिसेंची हकालपट्टी
www.24taas.com, झी मीडिया, सावंतवाडी

कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केसरकरांचा राजीनामा मागितल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिलीय. प्रदेशाध्यक्षांच्या सभेला गैरहजर राहिल्यामुळं केसरकरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.

केसरकरांनी राजीनामा दिला तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आलीय. आता व्हिक्टर डांटस हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून राणे विरुद्ध केसरकर असा सामना रंगला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि केसरकरांना बजावून सुद्धा त्यांनी राणेंचा प्रचार करण्यास नकार दिला होता.

या पार्श्वभूमिवर आज सावंतवाडीत शरद पवारांची प्रचारसभा होत आहे. या प्रचारसभेपूर्वी दीपक केसकरांनी शरद पवारांची हेलिपॅड उतरलं त्या ठिकाणी जावून भेट घेतली. तेव्हा शरद पवार यांनी केसरकर यांची कानउघडणी केल्याचं समजतंय. अशाप्रकारे बहिष्कार घालण्याची भूमिका योग्य़ नसल्याचं पवारांनी केसरकर यांना सुनावलंय. आता केसरकरांचं पुढचं पाऊल काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 13, 2014, 13:40
First Published: Sunday, April 13, 2014, 13:40
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?