www.24taas.com, झी मीडिया, धुळेनंदुरबारमध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. गुजरातचा विकास होतो मात्र जवळच्या धुळे, नंदुरबारचा का नाही, असा सवाल नरेंद्र मोदींनी केलाय.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे नंदुरबारच्या भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारसभेसाठी ते आले होते. त्यावेळी जोरदार टीका केली. मोदी सुरुवातीला मराठीत नमस्कार म्हणत स्थानिक बोलीभाषेतून संवाद साधत छाप पाडण्याचा प्रयत्न केला. या सभेला विक्रमी ग्रदी झाली होती.
नंदुबारचा विकास रोखणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा, असे आवाहन करत विकासासाठी भाजपला साथ द्या, असे गाऱ्हाने मोदी यांनी घातले. दरम्यान, नरेंद्र मोदी यांची आज धुळ्यात सभा होतीय. धुळे लोकसभा मतदारसंघातले उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी होणा-या या सभेची जय्यत तयारी करण्यात आलीय. मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 22, 2014, 13:38