मोदींना 'हिटलर' म्हणणाऱ्या चिरंजीवीवर अंड्यांचा मारा

मोदींना `हिटलर` म्हणणाऱ्या चिरंजीवीवर अंड्यांचा मारा

www.24taas.com, झी मीडिया, मछलीपटनम

आंध्रप्रदेशच्या मछलीपटनममधल्या एका जाहीर सभेत अभिनेता चिरंजीवी यांना अंड्यांचा मार खावा लागलाय. त्यांनी नरेंद्र मोदींना `हिलटर` म्हणून संबोधल्यानं ही वेळ त्यांच्यावर आली.

अभिनेता तसंच केंद्रीय मंत्री तसंच आंध्रप्रदेशनचे काँग्रेस निवडणूक अभियान समितीचे प्रमुख चिरंजीवी यांनी आपल्या भाषणा दरम्यान भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे `हिटलर` आणि `तानाशाह` असल्याचं वत्कव्य केलं.

`मोदी तानाशाह आहेत, ते हिटलर आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणींसारख्या वरिष्ठ नेत्यांना अडगळीत टाकलंय` असं वक्तव्या चिरंजीवी यांनी केलं होतं.

चिरंजीवी कोनेरू सेंटर इथल्या एका रॅलीत भाषण करत होते. परंतु, त्यांनी मोदींविषयी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या दिशेने उपस्थितांमधून अंड्यांचा मारा करण्यात आला. त्यानंतर त्यांना आपलं भाषण काही काळ थांबवावं लागलं.

थोड्या वेळानं पोलिसांना स्थितीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं. त्यानंतर चिरंजीवी यांनी आपलं भाषण पूर्ण झालं... पोलिसांनी या घटनेमध्ये दोन संदिग्ध आरोपींना ताब्यात घेतलंय.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 26, 2014, 19:43
First Published: Saturday, April 26, 2014, 19:43
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?