www.24taas.com, ज्येष्ठ अभिनेत्री आणि ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमा मालिनी मथुरा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत, त्यांच्याविरोधात आज फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
एका शाळेमध्ये दोन दिवसांपूर्वी परवानगीशिवाय सभा आयोजित केल्याचा आरोप हेमा मालिनी यांच्यावर आहे.
हेमा मालिनी यांनी मागील आठवड्यात मथुरा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 14, 2014, 21:03