संसदेत पहिल्यांदा घुमला ठाकरे घराण्याचा आवाज

संसदेत पहिल्यांदा घुमला ठाकरे घराण्याचा आवाज
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक शिवसैनिकांना संसदेत पाठवले, शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा आवाज त्यांनी संसदेत घुमविला. पण लोकशाहीच्या मंदिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण करून पहिल्यांदा ठाकरे घराण्याचा आवाज संसदेच्या वास्तुत घुमविला.

एनडीए संसदीय पक्षाच्या प्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यासाठी आज एनडीएतील घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पोहचले. त्याच्यासमवेत शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार काही पदाधिकारी आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते.

यावेळी आपल्या भाषणात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून आपण स्वप्न पाहात होतो. ते आज पूर्ण झाले आहे. अच्छे दिन आने वाले है, अशी आम्ही सांगितले होते, त्या चांगल्या दिवसांची आज सुरूवात होत आहे. आज मला या प्रसंगी माझे दिवंगत वडील श्री बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर आम्ही चालत आहोत आणि पुढेही चालत राहणार आहोत. भाजपसोबत शिवसेनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राहणार असल्याचे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिले.

देशाने जो विश्वास आपल्यावर दाखविला आहे, तो विश्वास आपली सरकार पूर्ण करेल असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 20, 2014, 15:54
First Published: Tuesday, May 20, 2014, 16:37
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?