पराभव समोर दिसत असल्यानं पवारांचा तोल सुटला- गडकरी

पराभव समोर दिसत असल्यानं पवारांचा तोल सुटला- गडकरी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शरद पवारांनी काल जाहीर सभेमध्ये मोदींना ट्रीटमेंटची गरज असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर आज भाजप नेते नितीन गडकरींनी टीका केलीय. मोदींवर पवारांनी केलेलं वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण आहे. पवारांना पराभव समोर दिसत असल्यानं त्यांचा तोल सुटल्याचं गडकरींनी म्हटलंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेनं भाजपमधून पवारांवर टीका होतेय. जालन्यात प्रचारसभेत शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. मोदी काँग्रेसमुक्त देशाची घोषणा करत आहेत मात्र त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशा शब्दात पवारांनी मोदींवर शरसंधान साधलं होतं.

पवारांच्या टीकेला उत्तर देताना नितीन गडकरींनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 31, 2014, 12:55
First Published: Monday, March 31, 2014, 12:55
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?