www.24taas.com, झी मीडिया, पुणेशिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांनी अखेर जय महाराष्ट्र केला आहे. बाबर यांना लोकसभेसाठी उमेदवारी सेनेकडून जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुले बाबर हे दुखावले गेले होते. त्यांनी शिवसेना पक्ष पदांचा राजीनामा देत सेनेला रामराम केलाय. त्यामुळे सेनेचे शिवबंधन धागा पुन्हा एकदा तुटल्याचे पाहायला मिळालेय.
बाबर हे आपली पुढील भूमिका कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरविणार आहेत. पुण्यातील मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या चिन्हावर बाबर नेतृत्व करीत होते. मात्र, बाबर यांना मावळ मतदार संघातून उमेदवारी डावलण्यात आली. त्यामुळे बाबर हे नाराज होते. त्यांनी आप आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बाबर यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेची गोची झाली आहे.
नाराज बाबर हे मनसेच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. 22 तासखेला होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बाबर राजीमान्यावर भाष्य करणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 11, 2014, 17:09