गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांकडे लक्ष

गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांकडे लक्ष
www.24taas.com, झी मीडिया, पणजी

गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठीचा प्रचार संपलाय. गोव्यात लोकसभेच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन जागा असून मतदान १२ एप्रिलला होतंय.

यावेळी निवडणुका जाहीर झाल्यापासून एकाही राष्ट्रीय पक्षाच्या मोठ्या नेत्यांची सभा झाली नाही. त्यामुळे प्रचारात रंगत आलीच नाही. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाने मात्र स्थानिक नेत्यांना घेऊन प्रचाराच्या फैरी झाडल्या.. तर काँग्रेसने ही स्थानिक नेत्यांवर भर देत प्रचार केला.

उत्तरेत सात उमेदवार असून ५लाख १५ हजार ४४३ मतदार आहेत मात्र इथ बहुरंगी लढत असली तर खरी लढत कॉंग्रेस विरुद्ध भाजपा अशीच होईल तर दक्षिणेत १२ उमेदवार रिंगणात असले तरी इथली लढतही भाजपचे नरेंद्र सावईकर आणि काँग्रेसचे अलेक्स रेजिनाल्ड यांच्यात होईल असा अंदाज आहे.

इथ ५ लाख ४५ हजार ३३७ मतदार आहेत . मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातल्या दोन्ही जागा चांगल्या फरकाने जिंकू असा दावा केलाय तर काँग्रेसनेही आपणच जिंकू अस म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 11, 2014, 23:30
First Published: Friday, April 11, 2014, 23:36
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?