बप्पी लहरींपेक्षा त्यांच्या बायकोकडे अधिक सोने

बप्पी लहरींपेक्षा त्यांच्या बायकोकडे अधिक सोने

www.24taas.com, झी मीडिया, कोलकता
सोने आणि बप्पी लहरी यांचे प्रेम आपण सर्वजण जाणतो. नेहमी सोन्याच्या मोठ-मोठ्या चेन गळ्यात घालणारे बप्पीदा मात्र सोन्याच्याबाबतीत आपल्या पत्नीपेक्षा गरीब आहेत. बप्पीदांकड़े सुमारे १२ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तसेच बीएमडब्ल्यू आणि ऑडीसह पाच कारचे मालक आहेत.

बप्पी लहरी यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात त्यांच्याकडे १७ लाख ६७ हजार ४५१ रुपये किंमतीचे ७५४ ग्रॅम सोने आहे. तर त्यांची पत्नी चित्राणी यांच्याकडे २० लाख ७४ हजार ८३० रुपयांचे ९६७ ग्रॅम सोने आहे.

बॉलिवुडचे डिस्को किंग असणाऱ्या सुप्रसिद्ध संगीतकार बीजेपीच्या तिकीटावर श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे २ लाख २० हजार किंमतीचे ४.६२ किलोचे चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा आहे.

त्यांच्या पत्नीकडे ३ लाख ५९ हजार ६०० रुपये किंमतीची ८.९ किलो चांदी आहे आणि ४ लाख २७ हजार ३५३ किमतीचे ३.३ कॅरेटचे हिरे आहेत.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 11, 2014, 13:16
First Published: Friday, April 11, 2014, 13:16
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?