www.24taas.com, झी मीडिया, मुंबईउद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि विनोद तावडे यांची मातोश्रीवर चर्चा सुरू आहे.
मनसेशी भाजपने जवळीक साधल्याचं चित्र दिसून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
मात्र यानंतर युतीतील दोन जुने मित्र शिवसेना आणि भाजपमधील दरी वाढत चालली होती, यानंतर आज निवडणुका जवळ आल्याने वादग्रस्त प्रकरणांवर पडदा पाडण्यासाठी गोपीनाथ मुंडे आणि विनोद तावडे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले असल्याचं सांगण्यात येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते नितिन गडकरी नाशिकमधील एका कार्यक्रमात एकत्र आले होते. तसेच मुंबईतील एका हॉटेलात गडकरी आणि राज ठाकरे यांची गुफ्तगू झाल्याची चर्चा होती. यानंतर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.
First Published: Tuesday, March 18, 2014, 20:31