'वऱ्हाड निघालंय दिल्लीला'

`वऱ्हाड निघालंय दिल्लीला`
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सार्क देशाचे पंतप्रधान नवी दिल्लीत दाखल होत आहेत.

पाकिस्तानेचे पंतप्रधान नवाझ शरीफ सकाळी साडेदहा वाजता लाहौरहून पाकिस्तानसाठी रवाना झाले आहेत.

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि मॉरिशसचे पंतप्रधान शपथविधी सोहळ्यासाठी सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत.

बांगला देशच्या स्पिकरही शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत पोहोचल्या आहेत.

दिल्लीला रवाना होण्याआधी नवाझ शरीफ यांनी आपण भारतात शांतीचा संदेश घेऊन जात असल्याचं म्हटलं आहे.

मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी येणार पाहुणे
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमीद करजई
मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल यमीन अब्दुल गयूम
श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे
नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला
भुतानचे पंतप्रधान शोरिंग तोग्बे
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी
सुपरस्टार अमिताभ बच्चन
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर
अभिनेता सलमान खान

दिल्लीत राजकीय लगबग
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत राजकीय लगबग सुरू झाली आहे.

मोदींनी संभाव्य मंत्र्यांना सकाळी सकाळीच `चाय पे` बोलवून मंत्रिपद देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 26, 2014, 10:43
First Published: Monday, May 26, 2014, 11:13
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?