राहुल गांधीच्या सभेत ‘हर हर मोदी’च्या घोषणा

राहुल गांधीच्या सभेत ‘हर हर मोदी’च्या घोषणा

www.24taas.com, झी मीडिया, देवरिया
उत्तर प्रदेशच्या देवरिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या समर्थनार्थ काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या सभेत काही नागरिकांनी हर हर मोदींच्या घोषणा केल्या. तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग केला.

सभेत राहुल गांधी यावेळी काँग्रेसची सत्ता आली तर नागरिकांना मोफत उपचार आणि मोफत पक्की घरं देण्याचे आश्वासन देत होते, तसेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीवर गुजरात येथे अदानी यांनी एक रुपये प्रति वर्गमीटर भावाने जमीन देण्याचा आरोप करत असताना काही नागरिकांनी हर हर मोदी, घर घर मोदी अशा घोषणा सुरू केल्या.

तसेच काही कथित मोदी समर्थकांनी राहुल गांधींविरोधा आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग केला. हा प्रकार चिघळणार तेवढ्यात उपस्थित पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या नागरिकांना सभेच्या स्थळावरून बाहेर काढण्यात आले.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 9, 2014, 18:55
First Published: Friday, May 9, 2014, 18:55
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?