हेमामालिनी यांनी नाव बदललं...

हेमामालिनी यांनी नाव बदललं...

www.24taas.com, झी मीडिया, आग्रा

लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार हेमामालिनी यांनी आपल्या नावात बदल केलाय. याअगोदर त्यांचं नाव देओल हेमामालिनी धर्मेंद्र असं होतं परंतु आता मात्र त्यांनी केवळ हेमामालिनी हे नाव धारण केलंय.

जनता आपल्याला याच नावानं ओळखते, त्यामुळे याच नावानं आपण निवडणूक लढणार असल्यांच हेमामालिनी यांनी म्हटलंय. उमेदवारी अर्जात त्यांनी आपलं नाव `हेमामालिनी` एव्हढंच लिहिलंय.

भाजपच्या उमेदवार हेमामालिनी यांनी फॉर्म सात (ए) बनण्यापूर्वीच डिक्लेरेशन फॉर्म जमा केलाय. यामध्ये त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपलं नाव बदलण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं नाव देओल हेमामालिनी धर्मेंद्र या ऐवजी हेमामालिनी केलंय.

नाव बदलल्यानंतर हेमामालिनी आता ईव्हीएम मशीनमध्ये चौथ्या क्रमांकावर आल्यात. यापूर्वी चौथ्या क्रमांकावर बसपा उमेदवार योगेश द्विवेदी होते. द्विवेदी आता तिसऱ्या क्रमांकावर आलेत. पहिल्या स्थानावर सपा उमेदवार चंदन सिंह तर दुसऱ्या स्थानावर रालोदचे उमेदवार जयंत चौधरी आहेत.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 12, 2014, 13:32
First Published: Saturday, April 12, 2014, 13:32
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?