राहुल यांचं भाषण म्हणजे 'कॉमेडी शो', मोदींची टीका

राहुल यांचं भाषण म्हणजे `कॉमेडी शो`, मोदींची टीका
www.24taas.com, झी मीडिया, झाशी

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या वाकयुद्धात दिवसेंदिवस भर पडतेय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभा म्हणजे `कॉमेडी शो` आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केलीय.

"तुम्ही टी.व्ही.वरील कपिल शर्मा यांचा शो पाहिलाच असेल. तो आता लवकरच बंद होणार असून, त्याऐवजी काँग्रेस नेत्यांची भाषणे संकलित करून दाखविली जाणार आहेत. यामुळं सर्वांचाच निवडणुकीमुळे आलेला थकवा दूर होईल,`` असं वक्तव्य मोदींनी केलं. रविवारी झाशी इथं झालेल्या जाहीर सभेत मोदी बोलत होते.

तर लखनौ, झाशी, महोबा आणि फत्तेपूर इथं झंझावाती सभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढलं. मोदी म्हणाले, की गांधी माय-लेकांमध्ये खोटे बोलण्याची स्पर्धाच लागली आहे. या माय-लेकांच्या मनात माझ्याविषयी एवढा राग आहे, की मी समोर आलो तर हे मला जिवंत सोडतील की नाही याची खात्री देता येणार नाही. मला पाहताच क्षणी ते मारहाण करायला सुरवात करतील.

प्रत्येक सभेत राहुल भय्या गुजरातमध्ये लोकायुक्‍त नसल्याचा खोटा दावा करत आहेत. निदान गुजरातमधील लोकायुक्‍तांच्या नेमणुकीबाबतची खरी माहिती तरी त्यांनी जाणून घ्यावी. राहुल गांधी यांचं भाषण ऐकून हसू येतं. राहुल गांधींच्या जाहीर सभा लवकरच `कॉमेडी शो`ची जागा घेतील, असा टोला मोदी यांनी लगावला.

लोकायुक्‍तांनीच गुजरातमधील एका काँग्रेस मंत्र्याला जंगलातील लाकडे चोरल्याप्रकरणी दोषी ठरविलंय. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना देशातील मोदी लाट दिसत नाही. त्यांना मागील दहा वर्षे देशात वाढलेली महागाई आणि भ्रष्टाचारही दिसला नाही. त्यांना केवळ गांधी माय-लेकच दिसतात, असं मोदी यांनी सांगितलं.

भाषण लिहून देणारे वाट लावणार

"गुजरातमध्ये 27 हजार कोटी पदे रिक्‍त असल्याचा दावा राहुल गांधी करत आहेत. प्रत्यक्षात गुजरातची लोकसंख्या मात्र सहा कोटी एवढी आहे. राहुल बोलण्याच्या ओघात भरकटत चालले आहेत. गांधी माय-लेकांच्या गुजरात प्रेमाला भरतं आलं असून, ते वारंवार गुजरातला जातात अन्‌ काहीबाही बोलून येतात. राहुल यांना भाषण लिहून देणारं टोळकंच काँग्रेसची वाट लावत आहे,`` अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 28, 2014, 11:13
First Published: Monday, April 28, 2014, 11:13
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?